israel hamas war | भारतावर का नाराज झाला इस्रायल ? नेतान्याहू यांनी सांगितले कारण
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू 27 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रात आणलेल्या प्रस्तावाला गंभीर स्वरूपातील त्रूटी असलेला म्हटले आहे. भारताने या प्रस्तावावर घेतलेल्या भूमिकेवर इस्रायल नाराज झाला आहे.
तेल अविव | 31 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान सुरु असलेल्या युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत एक प्रस्थाव आला होता. त्यात इस्रायल आणि हमास यांच्यातील शत्रूत्व संपवून तात्काळ युद्धविरामाचे आवाहन करण्यात आले होते. भारताने या प्रस्तावापासून अलिप्त राहून तटस्थ भूमिका घेतली होती. यानंतर भारताच्या या भूमिकेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताच्या या भूमिकेवर टिप्पणी केली आहे. त्यांनी सोमवारी म्हटले की कोणताही सभ्य देश ज्यात भारताचाही समावेश आहे, या सारखी निर्दयता सहून करु शकणार नाही.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू 27 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रात आणलेल्या प्रस्तावाला गंभीर स्वरूपातील त्रूटी असलेला म्हटले आहे. या प्रस्तावावर भारतासारख्या देशाची भूमिकेवर टिका करीत नेतान्याहू यांनी म्हटले की, ‘या प्रस्तावात अनेक त्रूटी होत्या, मला हे पाहून दु:ख झाले की इस्रायलमध्ये जे काही झाले आहे त्याचा कठोर निषेध करावा की नाही याचाही अनेक मित्रांना विसर पडला. हे असे कृत्य होते जे भारतासारखा सभ्य देश सहनच करु शकत नाही. त्यामुळ आपल्याला आशा आहे की असा प्रस्ताव पुन्हा येऊ नये.’
नेतान्याहू यांनी पुढे म्हटले की, ‘ज्याप्रकारे अमेरिका पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ले किंवा 9/11 च्या अतिरेकी हल्ल्यानंतर युद्धविरामसाठी होकार देणार नाही. तसा इस्रायल देखील हमासबरोबरच युद्धविराम करण्यासाठी सहमात होणार नाही. इस्रायल हमासला संपवल्याशिवाय शांत बसू शकत नाही.’ युद्धविरामचे आवाहन म्हणजे हमास समोर आत्मसमर्पण करणे, दहशतवादासमोर आत्मसमर्पण करणे, नृशंसतेसमोर आत्मसमर्पण करण्यासारखे आहे. आणि बायबलमध्ये म्हटले आहे की शांततेचा एक काळ असतो आणि युद्धाचाही एक काळ असतो. आणि हा युद्धाचा काळ आहे असेही ते म्हणाले.
‘हमास’ आणि ‘ओलीस’ शब्दाचा उल्लेख नाही
इस्रायल – हमास युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आणलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावात पॅलेस्टिनी संघटना ‘हमास’ आणि ‘ओलिस’ या शब्दाचा उल्लेख नव्हता. प्रस्तवाच्या बाजूने 120 मते पडली. तर 14 देशांनी याच्या विरोधात मतदान केले. भारताने अलिप्त रहाणे पसंत केले. या मतदानापूर्वी कॅनडाने या प्रस्तावात दुरुस्ती करून हमासचा उल्लेख करावा असे म्हटले होते. परंतू कॅनडाचा प्रस्ताव दोन तृतीयांश मता अभावी नामंजूर झाला. भारतही दुरुस्तीच्या बाजूने होता आणि त्याने 86 अन्य देशांशी मिळून हमासचा उल्लेख करण्याचे समर्थन केले होते. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर नृशंस हल्ला केल्याने 1400 जणांचा हत्या आणि 200 जणांचे अपहरण केले आहे. त्यानंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 8,300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.