Ismail Haniyeh Killed : इराणमध्ये घुसून हमास चीफचा खात्मा, इस्रायलने आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला संपवलं
Ismail Haniyeh Killed : मागच्या 9 महिन्यापासून बदल्याच्या आगाीमध्ये होरपळणाऱ्या इस्रायलने अखेर आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला संपवलं आहे. मागच्यावर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलने इतिहासातील सर्वात भीषण हिंसाचार अनुभवला. तो बदला आता पूर्ण झालाय.
मागच्यावर्षी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. अनेक निरपराध, निर्दोष नागरिकांची हत्या केली होती. गर्भवती स्त्रियांना मारलं होतं. हमासच्या या कृत्यानंतर जगाने एक मोठं युद्ध पाहिलं. इस्रायलने पॅलेस्टाइनमध्ये घुसून हमासवर अनेक हल्ले केले. पण त्याची आग शांत होत नव्हती. कारण या सगळ्यामागचा मास्टरमाइंड सापडत नव्हता. 9 महिन्यापासून बदलच्या आगाीमध्ये होरपळणाऱ्या इस्रायलने अखेर हमासचा चीफ इस्माइल हानियाला संपवलं. महत्त्वाच म्हणजे गाझा, पॅलेस्टाइन, कतर या देशात नाही, तर इराणची राजधानी तेहरानमध्ये हानियाला संपवलं. हमासने स्वत: स्टेटमेंट जारी करुन याची पृष्टी केली आहे. मागच्या 24 तासात इस्रायलने आपल्या दोन मोठ्या शत्रुंना संपवलं आहे.
हमास प्रमुख इस्माइल हानिया मंगळवारी इराणचे नवीन राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी झाला होता. या दरम्यान त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी म्हणजे आज बुधवारी इस्र्यायलने इस्माइल हानियाच घरच उडवून दिलं. त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज बुधवारी सकाळी इस्माइल हानिया ज्या घरात उतरला होता, ते घरच उडवून दिलं.
इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची प्रतिक्रिया काय?
तेहरानमध्ये इस्माइल हानिया यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं, असं इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितलं. इस्माइल हानिया आणि त्यांचा बॉडीगार्ड या हल्ल्यात मारला गेला. स्फोट घडवून इस्माइल हानियाला संपवलं. हल्ला बुधवारी करण्यात आला. कसा हल्ला झाला त्याची चौकशी सुरु आहे, असं आयआरजीसीच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं.
बेरुतमध्ये सुद्धा एअर स्ट्राइक
इस्रायलने आज त्यांच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्सवरील हल्ल्याचा सुद्धा बदला घेतला. लेबनानची राजधानी बेरुतवर काल इस्रायलने एअर स्ट्राइक केला. त्यात हिजबुल्लाहचा कमांडर फउद शुकर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गोलान हाइट्स येथे शनिवारी एका फुटबॉल मैदानात रॉकेट हल्ला झाला. यात 12 लहान मुलांसह काहीजणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याचा बदला इस्रायलने घेतला. हिजबुल्लाहला किंमत चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलने आधीच दिला होता.