hezbollah pager blast: पेजर कसा बनला बॉम्ब? इस्त्रायलच्या मोसादने चिपमध्ये बॉम्ब बसवला का? पेजर बनवणारी कंपनी…

hezbollah pagers explode in lebanon: पेजर स्फोट हल्ल्यानंतर रडारवर आलेल्या तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष हसू चिंग कुआंग यांनी आमच्या कंपनीने हे पेजर तयार केले नसल्याचे म्हटले आहे. हे पेजर युरोपियन कंपनीने बनवले होते. या कंपनीला आमच्या कंपनीचा ब्रँड वापरण्याचा अधिकार आहे.

hezbollah pager blast: पेजर कसा बनला बॉम्ब? इस्त्रायलच्या मोसादने चिपमध्ये बॉम्ब बसवला का? पेजर बनवणारी कंपनी...
hezbollah pager blast
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 10:05 AM

लेबनान आणि सीरियामधील काही भागांत मंगळवारी पेजर बॉम्बस्फोट झाले. तब्बल तासभर पेजर बॉम्बस्फोट होत राहिले. कोणाच्या हातात पेजर असताना त्यामध्ये स्फोट झाला तर कोणाच्या खिशात पेजर असताना त्यामध्ये स्फोट झाला. त्यानंतर सर्वत्र आक्रोश आणि किंचाळणे ऐकू येत होते. लेबनॉनची अतिरेकी संघटना हिजबुल्लाहने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. पाच महिन्यांपूर्वी इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने पेजरमध्ये स्फोटके बसवली होती, असा दावा आता केला जात आहे. तसेच आता या संपूर्ण प्रकरणात तैवानच्या कंपनीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

इस्त्रायलचे गुप्त ऑपरेशन?

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलने मोसाद विरोधात चालवलेले हे गुप्त ऑपरेशन आहे. हिजबुल्लाने तैवानची कंपनी गोल्ड अपोलोला (Gold Apollo) जवळजवळ 3000 पेजरची ऑडर दिली होती. परंतु हे पेजर लेबनानमध्ये दाखल होण्यापूर्वीच त्यात छेडछाड करण्यात आली. हे पेजर या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान तैवानहून लेबनॉनला पाठवण्यात आले होते. या हल्ल्याचा कट काही महिन्यांपूर्वीच रचला गेल्याचे दिसते.

संदेश आला स्फोट सुरु झाला

पेजर तैवान कंपनीच्या AP924 मॉडेलचे होते. तैवानहून लेबनॉनला पाठवलेल्या पेजरच्या बॅचमध्ये प्रत्येक पेजरला एक ते दोन औंस स्फोटके जोडलेली होती. हे स्फोटक पेजरमध्ये बॅटरी शेजारी लावली होती. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांच्या पेजरवर दुपारी 3.30 वाजता एक मेसेज आला. या संदेशामुळे पेजरमध्ये बसवलेले स्फोटक सक्रिय झाली आणि स्फोट झाले. पेजरमध्ये विस्फोट होण्यापूर्वी बीप आवाज आल्याचा दावा केला जात आहे. मोसादने पेजरमध्ये एक लहान बोर्ड इंजेक्ट केला होता. तो इंजेक्ट स्कॅनरने डिटेक्ट करणे अशक्य होते.

हे सुद्धा वाचा

मोसादने पेजरमध्ये लावले पीईटीएन स्फोटक

अरेबियाच्या स्काय न्यूज रिपोर्टनुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने हिजबुल्लाहच्या पेजरमध्ये पीईटीएन बसवले होते. हा प्रत्यक्षात एक प्रकारचा स्फोटक आहे, जो पेजर बॅटरीवर वापरला जात होता. बॅटरीचे तापमान वाढल्याने या पेजर्सचा स्फोट झाला. या स्फोटकाचे वजन 20 ग्रॅमपेक्षा कमी होते.

कंपनीने हात झटकले

दरम्यान या हल्ल्यानंतर रडारवर आलेल्या तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष हसू चिंग कुआंग यांनी आमच्या कंपनीने हे पेजर तयार केले नसल्याचे म्हटले आहे. हे पेजर युरोपियन कंपनीने बनवले होते. या कंपनीला आमच्या कंपनीचा ब्रँड वापरण्याचा अधिकार आहे.

तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.