गुप्त ऑपरेशन, सीक्रेट व्हेपन…मोसादचे काम चालते कसे? किती आहे एजंट अन्…

israel mossad operation: मोसादमध्ये जवळपास 7000 कर्मचारी आहे. या गुप्तचर संस्थेचे वार्षिक बजेट तीन बिलियन डॉलर म्हणजे 250 अब्ज रुपये आहे. मोसादच्या सर्वात टॉप रँकच्या अधिकाऱ्यास संचालक म्हटले जाते. हे संचालक मोसादची सर्व सूत्र चालवतात.

गुप्त ऑपरेशन, सीक्रेट व्हेपन...मोसादचे काम चालते कसे? किती आहे एजंट अन्...
israel mossad operation
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 4:31 PM

हमास आणि इस्त्रायल युद्धात चर्चा मोसादची होत आहे. पेजरमधील स्फोट असो की इराणमध्ये जाऊन हमास प्रमुख इस्माईल हानियाला याला संपवणे असो…आता हिजबुल्लाह चीफ सैय्यद हसन नसरल्लाह याचाही खात्मा झाला आहे. एकमागे एक इस्त्रायलचे ऑपरेशन यशस्वी होत आहे. त्या मागे सर्वात महत्वाची भूमिका इस्त्रायल गुप्तचर संस्था मोसादची आहे. 1949 मध्ये इस्त्रायलची निर्मिती झाल्यानंतर ‘हग्गाना’ या गुप्तचर संस्थेला मोसाद म्हटले जाऊ लागले.

मोसादचा अर्थ काय

मोसाद हा एक हिब्रू शब्द आहे. त्याचा अर्थ संस्था होतो. हिब्रूमध्ये मोसादचे नाव ‘मोसाद मेरकाजी ले-मोदिन-उले तफकीदीम मेय्यूहादिम’ आहे. इंग्रजीत त्याला सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर इंटेलिजेंस एंड ऑपरेशन्स म्हणतात. 1949 मोसाद नाव झाल्यावर त्याला सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर कोऑर्डिनेशन म्हटले जाऊ लागले. त्याचे मुख्यालय तेल अवीवमध्ये आहे.

मोसादमध्ये जवळपास 7000 कर्मचारी आहे. या गुप्तचर संस्थेचे वार्षिक बजेट तीन बिलियन डॉलर म्हणजे 250 अब्ज रुपये आहे. मोसादच्या सर्वात टॉप रँकच्या अधिकाऱ्यास संचालक म्हटले जाते. हे संचालक मोसादची सर्व सूत्र चालवतात. आता मोसादचे संचालक डेव्हीड बार्निया आहे. जून 2021 मध्ये ते संचालक झाले. बार्निया यांचे नाव इस्त्रायलच्या टॉप एजंटमध्ये आहे. त्यांनी 1996 मध्ये मोसाद ज्वाइन केले होते. त्यानंतर वेगाने मोसादमध्ये एक एक पद ते मिळवत राहिले. हमासने जेव्हा इस्त्रायल नागरिकांचे अपहरण केले तेव्हा डेव्हीड बार्निया यांनीच त्या अतिरेक्यांशी नेगोशिएशन केले होते. मोसादचे प्रमुख सरळ पंतप्रधानांना रिपोर्ट करतात.

हे सुद्धा वाचा

कसे करतात मोसाद ऑपरेशन

मोसादमध्ये सहा विभाग आहे. पहिला कलेक्शन डिपार्टमेंट आहे. जे हेरगिरीच्या कारवाया करतात. दुसरा पॉलिटिकल एक्शन विभाग आहे. तो राजकीय घटनांचे नियंत्रण करतो. दुसऱ्या देशांच्या सरकारशी डिल केले जाते. तिसरा म्हणजे ‘स्पेशल ऑपरेशन्स डिव्हिजन’ आहे. हा विभाग मोसादचे धोकादायक ऑपरेशन करतो. चौथा LAP विभाग आहे. जो मानसशास्त्रीय युद्ध आणि प्रचार कार्ये चालवतो. पाचवे तंत्रज्ञान विभाग आहे, जे मोसादसाठी नवीन शस्त्रे आणि गॅझेट्स विकसित करतो. सहावा संशोधन विभाग आहे, जो मोसादला पार्श्वभूमी आणि इतर गोष्टींची माहिती देतो.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.