Israel-Hamas War | आता घडणार फक्त विद्ध्वंस, युद्धात इस्रायलसोबत उतरली अमेरिका, हमाससोबत कोण-कोण?
Israel-Hamas War | युद्धाच सगळ समीकरणच बदललं. जगातल्या दोन मोठ्या देशांनी मौन धारण केलय. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 3000 मृत्यू झाले आहेत. 14 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जेरुसलेम : इस्रायल आणि हमासच्या युद्धात आता अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकेच्या एंट्रीने हमास आणि इस्रायल युद्ध आणखी धोकादायक वळणावर जाईल. या युद्धात अमेरिका इस्रायलसोबत आहे. आम्ही इस्रायलसोबत भक्कमपणे उभे आहोत, असं अमेरिकेने म्हटलं आहे. जी मदत लागेल, ती सर्व करण्यास अमेरिका तयार आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एकदिवसापूर्वी म्हणाले की, “आमच परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. हमास एक दहशतवादी संघटना असून ज्यूना संपवण हा हमासचा एकमेव उद्देश आहे” हमासच्या हल्ल्यात 14 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काह जण जखमी तर काही बेपत्ता आहेत.
ज्यो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केलीय व शक्य ती सर्व मदत करण्याच आश्वासन दिलय. अमेरिकेने इस्रायलला 8 अब्ज डॉलरची मदत देण्याची घोषणा केलीय. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर जगाची दोन गटात विभागणी झाली आहे. काही देश इस्रायलसोबत, तर काही देश हमासला आपल समर्थन देतायत. अमेरिका, भारत, ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. इस्लामिक देशांनी हमासच समर्थन केलय. काही देश सीजफायरच आवाहन करतायत.
इस्रायलच्या समर्थनात कुठले-कुठले देश ?
अमेरिका
भारत
ऑस्ट्रेलिया
यूक्रेन
ब्रिटेन
फ्रांस
नॉर्वे
ऑस्ट्रिया
यूरोपियन यूनियन
बेल्जियम
हमासच्या बाजूने असलेले देश
इरान
कतर
कुवैत
लेबनान
यमन
इराक
सीरिया
कुठले देश मौन
रशिया, चीन या देशांनी इस्रायल-हमास युद्धावर मौन धारण केलय. युद्धाच्या परिस्थितीबद्दल या देशांनी चिंता व्यक्त केलीय. ते युद्धविरामाची मागणी करतायत. हे देश इस्रायलच्या बाजूने बोलत नाहीयत तसच हमासला सुद्धा साथ देत नाहीयत. आतापर्यंत किती मृत्यू?
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 3000 मृत्यू झाले आहेत. हजारोंच्या संख्येने लोक जखमी झालेत. इस्रायलमध्ये 1200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2800 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. गाजामध्ये 900 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या भूमीत हमासच्या 1500 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलय.