Israel Palestine Crisis | अमेरिकन करदात्यांच्या जोरावर इस्त्राईलवर हल्ला, माजी राष्ट्राध्यक्षांकडे कोणता दारुगोळा?

Israel Palestine Crisis | इराणसह मुस्लीम देशांनी पॅलेस्टाईनची कड घेतली आहे. इराणने तर इस्त्राईलवरील हल्ल्याचे कोण कौतुक केले आहे. तर अमेरिकेसह युरोपियन देशांनी इस्त्राईलला पाठिंबा दिला आहे. तर अमेरिकन करदात्यांच्या जोरावरच हमासने इस्त्राईलवर हल्ला चढवल्याचा गंभीर आरोप या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला आहे.

Israel Palestine Crisis | अमेरिकन करदात्यांच्या जोरावर इस्त्राईलवर हल्ला, माजी राष्ट्राध्यक्षांकडे कोणता दारुगोळा?
Follow us
| Updated on: Oct 08, 2023 | 4:09 PM

नवी दिल्ली | 8 ऑक्टोबर 2023 : शुक्रवारी पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्राईलसोबत वाद (Israel Palestine Crisis) उकरुन काढला. शनिवारी म्हणता म्हणता दोघांनी एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले चढवले. या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले आहे. मुस्लीम देशांनी जाहीरपणे पॅलेस्टाईनची री ओढली आहे. इराणने तर या हल्ल्याचे कौतुक केले आहे. अमेरिकेसह जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडने या हल्ल्याचा निषेध करत इस्त्राईलला पाठिंबा दिला आहे. तर अमेरिकन करदात्यांच्या जोरावरच हमासने इस्त्राईलवर हल्ला चढवल्याचा गंभीर आरोप या माजी राष्ट्राध्यक्षांनी (American President Attack on Joe Biden) केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जगावर परिणाम

पॅलेस्टाईन-इस्त्राईल युद्धाचे जगावर त्याचे परिणाम दिसू लागले आहे. सोने-चांदी महागले आहे. तर उद्या जगभरातील शेअर बाजारावर या युद्धाचे सावट दिसून येईल. रविवारी परदेशी शेअर बाजारावर या हल्ल्याचे परिणाम दिसून आले. इस्त्राईलच्या मुख्य TA-35 stock index तर 5.2 टक्क्यांनी घसरला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात निच्चांकी घसरण आहे. रियाधमधील Tadawul All Share Index मध्ये 1.2 टक्क्यांची घसरण झाली. कुवेत, कतार, ओमान, बहरीन आणि इजिप्तमधील शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु होते. उद्या जगभरातील स्टॉक मार्केटवर त्याचा परिणाम दिसेल.

हे सुद्धा वाचा

युद्धासाठी अमेरिकेचा पैसा

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने इस्त्राईलवर हल्ला चढवल्यावर आता जगभरात विविध आरोपांच्या फैरी झडत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर थेट हल्ला चढवला. हमासला या युद्धासाठी पैशांची रसद पोहचविण्यात आली आहे. हा पैसा अमेरिकन करदात्यांचा असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी इस्त्राईलवरील हमासच्या हल्ल्याचा निषेध केला.

करदात्यांच्या पैशांतून हल्ला

‘पण खेदपूर्वक सांगावे लागत आहे की, हमास जो इस्त्राईलवर हल्ले करत आहे. त्यात अमेरिकन डॉलरची त्यांना मदत मिळाली आहे. बायडेन प्रशासनातील अनेक अहवाल हे ओरडून सांगत आहेत. हमासला अमेरिकन डॉलरची मदत मिळाली आहे. हा पैसा अमेरिकन करदात्यांचा आहे. त्याचा वापर हमास करत आहे.’ असा तुफान हल्ला त्यांनी बायडेन प्रशासनावर चढवला.

हमासकडे आला कसा पैसा

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. अमेरिकन सरकारने गेल्या महिन्यात इराणला 6 अब्ज डॉलरची जी मदत केली. तोच पैसा हमास वापरत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका-इराण यांच्या कैदी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यावेळी हा निधी देण्यात आला होता, असे ट्रम्प यांनी सांगितले. हा आरोप होत असतानाच इराणने इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्याबद्दल हमासचे कौतुक केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या आरोपांना धार आली आहे. आता बायडेन सरकार त्यावर काय उत्तर देते हे समोर येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.