Hezbollah attack on America | बायडेन इस्रायल बाहेर पडताच, हेझबोल्लाहचा अमेरिकेवर रॉकेट हल्ला

Hezbollah attack on America | या हल्ल्यात किती नुकसान झालय?. हा हल्ला करण्यामागे कारण काय आहे?. 7 ऑक्टोबरला युद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर लेबनॉनच्या उत्तरी सीमेवर हेझबोल्लाहने जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

Hezbollah attack on America | बायडेन इस्रायल बाहेर पडताच,  हेझबोल्लाहचा अमेरिकेवर रॉकेट हल्ला
Israel-Palestine warImage Credit source: AP/PTI
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 1:43 PM

जेरुसलेम : राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल दौरा आटोपून निघताच हेझबोल्लाहने अमेरिकन सैन्य बेसवर रॉकेट डागले. बायडेन परतताच सीरियातील अमेरिकन सैन्य बेसला टार्गेट करण्यात आलं. इराकमध्येही अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यात आलय. काही सैनिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत. इराकमध्ये 24 तासांच्या आत सैन्य कॅम्पवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. पश्चिम आणि उत्तर इराकमध्ये सैन्य तळावर झालेल्या हल्ल्यात मित्र सैन्याचे काही जवान जखमी झालेत. कोणी जखमी झाल्याची माहिती नाहीय. एकवर्षात पहिल्यांदाच इराकमध्ये इराण समर्थित समूहाने अमेरिकेच्या सैन्य बसेवर हल्ला केलाय. अमेरिकन अधिकाऱ्यांनी तीन ड्रोन हल्ले झाल्याच म्हटलं आहे. इराकच्या पश्चिमेला आणि कुर्दिस्तान क्षेत्रात अल-हरीर एयर बेसवर हल्ला झालाय.

इराकमधील इस्लामिक रेजिस्टेंस स्टेटमेंट जारी करुन दोन हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या भागांविरोधात अधिक अभियान चालवणार असल्याच म्हटलं आहे. हा हल्ला म्हणजे इस्रायल-हमास युद्धाचा परिणाम आहे. अमेरिका इस्रायलला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांची मदत करतोय. 7 ऑक्टोबरला युद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर लेबनॉनच्या उत्तरी सीमेवर हेझबोल्लाहने जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. इस्रायल विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हेझबोल्लाहला इराणच समर्थन आहे. कशामुळे केला हल्ला?

मंगळवारी रात्री गाझाच्या एका हॉस्पिटलवर हल्ला झाला. यात 500 नागरिकांचा मृत्यू झाला. हेझबोल्लाहने यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरलय. इराकमधील अमेरिकन उपस्थिती संपवण्यासाठी अपील केलय. गाझामध्ये हॉस्पिटलवर इस्रायलने हवाई हल्ला केला, असं हमासचा आरोप आहे. इस्रायलने हे आरोप फेटाळून लावलेत. पॅलेस्टाइन इस्लामिक जिहाद संघटनेवर त्यांनी उलटे आरोप केलेत. इस्लामिक जिहादने डागलेल्या रॉकेटची दिशा भरकटून ते हॉस्पिटलवर पडलं असं इस्रायलच म्हणण आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.