Israel-Hamas conflict |’मोसाद’ला महत्त्वाचा मेसेज, परदेशात कोणाचा ‘गेम-ओव्हर’ होणार?

Israel-Hamas conflict | अशक्य हा शब्दच 'मोसाद'च्या शब्दकोशात नाही. युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर सुरु होणार मोठं ऑपरेशन. या हल्ल्यात आतापर्यंत 800 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Israel-Hamas conflict |'मोसाद'ला महत्त्वाचा मेसेज, परदेशात कोणाचा 'गेम-ओव्हर' होणार?
Israel-Hamas conflict
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 8:15 PM

जेरुसलेम : इस्रायलकडून मोठ्या युद्धाची घोषणा करण्यात आलीय. हमास विरुद्ध इस्रायलने मोठी कारवाई सुरु केलीय. यापुढे हमासच अस्तित्वच राहणार नाही, असा संकल्प इस्रायलने सोडलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसात इस्रायलच एक वेगळं रुप जगाला पहायला मिळू शकतं. शनिवारी सकाळी हमासचे दहशतवादी गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी तिथे अक्षरक्ष: हैदोस घातला. लहान मुलं, बाळं, महिला, वयोवृद्ध नागरिक कोणाला सोडलं नाही. हमासच्या या हल्ल्यात आतापर्यंत 800 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासला या युद्धाची मोठी किंमत चुकवीला लागेल, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री अविगडोर लिबरमॅन यांनी परदेशात असलेल्या हमास नेत्यांना धमकी दिली आहे.

माजी संरक्षण मंत्री लिबरमॅन यांनी परदेशातून इस्रायलविरोधात कट रचणाऱ्या हमास नेत्यांना संपवा अशी मागणी मोसादकडे केली आहे. मोसाद जगातील एक धोकादायक गुप्तचर संघटना आहे. मोसादच्या नावाची एक दहशत आहे. मोसादने याआधी इस्रायलच्या अनेक शत्रूंना परदेशातच संपवलय. आता पुन्हा एकदा मोसादकडून अशी Action सुरु होईल. जगाच्या पाठिवर कुठेही लपला, तरी इस्रायल आपल्या शत्रूला सोडत नाही. हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलय. त्यामुळे युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर लांब लपून बसलेल्या हमास नेत्यांची सुटका नाहीच. संपूर्ण इस्रायलला हादरवून सोडलय

इस्रायली डिफेन्स फोर्सेजचे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनिकयल हगारी यांनी, हमासने सुरु केलेल हे युद्ध हा अपराध असल्याच म्हटलं आहे. या युद्धात ज्याने कोणी हमासला साथ दिली आणि युद्धात उतरले, त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल. हमासच्या या हल्ल्याने संपूर्ण इस्रायलला हादरवून सोडलय. इस्रायली कॅबिनेटने हमास विरुद्ध सैन्य कारवाईला मंजुरी दिलीय. देश युद्धाच्या स्थितीत आहे, असं कॅबिनेटकडून सांगण्यात आलय. सरकारला आपल्या शत्रुविरोधात कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हमासने केलेला हा क्रूर हल्ला युद्ध अपराध आहे. महिला आणि मुलांना पळवून युद्ध कैदी बनवणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन आहे. हे इस्लामच्या विरोधात आहे, असं इस्रायली डिफेन्स फोर्सेजने एक्सवर म्हटलय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.