इस्रायलने अशी खेळली चाल, शत्रू हिजबुल्लाहच्या हजारो दहशतवाद्यांना केले अपंग
'ब्रेक युवर फोन' मोहिमेने हिजबुल्लाहला मोठा धक्का बसला आहे. त्यांची ही मोहीम देखील इस्रायलचे काही करु शकले नाही. इस्रायलने ऑपरेशन राबवत हिजबुल्लाहच्या सैनिकांना लक्ष्य केले. अनेकांना तर आधी काय झाले हे कळलेच नाही. अनेक जण या हल्ल्यामुळे अपंग झाले तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
‘ब्रेक युवर फोन’ मोहिमेने हिजबुल्लाहला या दहशतवादी गटाला मोठा धक्का बसला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा असे ऑपरेशन राबवले ज्याने संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. इस्रायलने जगातील सर्वात आश्चर्यकारक ऑपरेशन केले. हिजबुल्लाहच्या सैनिकांना वाटले की, त्यांनी जर पेजरचा वापर केला तर इस्रायल त्यांचा मागोवा घेऊ शकणार नाही. पण त्यांचा हा आत्मविश्वास त्यांच्यावरच भारी पडला. इस्रायलने त्यांचे मनसुबे हाणून पाडले. इस्रायलच्या पेजर हल्ल्यामुळे हिजबुल्ला पूर्णपणे हादरली आहे. कारण हिजबुल्लाहने या वर्षी फेब्रुवारीमध्ये फोन स्मॅश मोहीम सुरू केली होती. ही मोहीम युद्ध योजनेअंतर्गत राबवण्यात आली होती. ब्रेक द फोन मोहिमेचा मुख्य उद्देश इस्रायली हेरगिरी टाळणे हा होता. पण तसे होऊ शकले नाही.
13 फेब्रुवारी रोजी टेलिव्हिजनवरील भाषणात, हिजबुल्लाचे सरचिटणीस हसन नसराल्लाह यांनी त्यांच्या समर्थकांना कठोर इशारा दिला होता. हे फोन इस्रायली हेरांपेक्षाही धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे फोन लोखंडी पेटीत पुरले पाहिजे किंवा बंद केले पाहिजे. असे त्यांनी म्हटले होते. मंगळवारी संध्याकाळी उशिरा लेबनॉन आणि सीरियामध्ये हजारो पेजर स्फोट घडून आले. ज्यांच्या जवळ ते होते त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी झाले आहेत. पेजर हल्ल्यात इराणच्या राजदूतासह 4000 लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर आता पेजर अटॅक गुगल ट्रेंड होत आहे.
पेजरचा शोध कोणी लावला?
स्मॅश-द-फोन मोहिमेनंतर, हिजबुल्लाने पेजर वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीला 5,000 पेजर्सची ऑर्डर दिली. कंपनीचे संस्थापक हसू चिंग-कुआंग म्हणतात की हे पेजर युरोपियन कंपनीने बनवले आहे. फक्त आमचा ब्रँड वापरला आहे.
तीन ग्रॅम स्फोटकांमुळे विध्वंस
इस्त्रायली गुप्तचर संस्था मोसादने त्याच्या निर्मितीदरम्यान पेजरमध्येच एक विशेष बोर्ड लावला होता. त्यात तीन ग्रॅम स्फोटक होते. पण ते पकडणे फार कठीण होते. विशिष्ट कोड मिळाल्यानंतर स्फोटक सक्रिय केले गेले आणि लेबनॉनमध्ये एकाच वेळी 3,000 स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 4,000 हिजबुल्लाह सैनिक जखमी झाले आहेत. भारतासोबतच लेबनॉन, जर्मनी, कतार, ऑस्ट्रिया आणि ट्युनिशियासह 56 देशांतील लोक गुगलवर पेजर हल्ल्याबद्दल सर्च करत आहेत.
मोसादने पेजर हिजबुल्लाह लढवय्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच डिव्हाइस हॅक केले. लिथियम बॅटरी गरम होऊन त्याचा स्फोट झाला. पेजर्स अचानक वाजू लागले. त्यानंतर हिजबुल्लाच्या सैनिकांनी पेजरवर हातात घेतला. त्यावर आलेला संदेश वाचण्यासाठी त्यांनी तो त्यांच्या चेहऱ्याजवळ आणला आणि त्यात स्फोट झाला.
हिजबुल्लाच्या सैनिकांना चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. अनेकांची तर हातांची बोटेही गायब झाली आहेत. अनेकांची पेजर हिपजवळच ठेवलेले होते. त्यामुळे या स्फोटांमुळे अनेक हिजबुल्लाह लढवय्ये अपंग झाले आहेत.
इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने मोबाईल फोनद्वारे शत्रूंना आधीच लक्ष्य केले आहे. मोसादने आपल्या शत्रूंचा खात्मा करण्यासाठी फोनमध्ये स्फोटके ठेवली होती. यानंतर हॅकर्सने फोनवर एक विशेष कोड पाठवला. यामुळे फोन जास्त गरम होऊ लागले आणि अनेक ठिकाणी स्फोटही झाले.
Google वर पेजर अटॅक कोणत्या कीवर्डसह शोधला जात आहे? पेजर एक्स्प्लोजन, लेबनॉन, पेजर एक्सप्लोड, मोसाद, हिजबुल्ला पेजर या कीवर्डसह लेबनॉन आणि सीरियामधील पेजर हल्ल्यांबद्दल लोक Google वर शोधत आहेत.