Ibrahim raisi death : …म्हणून इस्रायलच्या मोसादवर संशय, कारण इब्राहिम रईसी हे शेवटचे….
Ibrahim raisi death : मोसाद अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नंतर जगातील दुसरी ताकदवर गुप्तहेर संघटना आहे. मोसाद संपूर्ण जगात सिक्रेट ऑपरेशन्ससाठी ओळखली जाते. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असला, तरी त्याला शोधून संपवण्याची मोसादमध्ये क्षमता आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृत्यूनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. ही दुर्घटना कशी घडली? त्याचा इराणमधील तपास यंत्रणा शोध घेत आहेत. काहींनी या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मोसादचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मोसाद ही इस्रायली गुप्तहेर संघटना आहे. जगातील अत्यंत धोकदायक गुप्तहेर संघटनांमध्ये मोसादचा समावेश होता. आपल्या शत्रुंना अत्यंत हुशारीने संपवण्यासाठी मोसाद ओळखली जाते. मोसादने आतापर्यंत अनेक मोठे ऑपरेशन्स केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शत्रुला मोसादने दुसऱ्या देशात जाऊन संपवलं आहे.
रविवारी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या दुर्घटनेत प्रेसिडेंट रईसी यांच्यासह 9 जणांचा मृत्यू झाला. रईसी यांचं हेलीकॉप्टर अजरबैजानहून परतत असताना संध्याकाळच्या सुमारास बेपत्ता झालं. सोमवारी सकाळी डोंगरांमध्ये या हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडला. 12 तासाच्या अथक प्रयत्नानंतर टर्कीच्या ड्रोनने हेलिकॉप्टरचा ढिगारा शोधून काढला. दुर्घटना घडली, त्यावेळी हवामान खूप खराब होतं. इराण सर्व अंगांनी तपास करत आहे.
ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर होते, त्यात….
इराणचे राष्ट्रपती रईसी रविवारी अजरबैजानचे राष्ट्रपति इल्हाम अलीयेव यांच्यासोबत एका धरणाच उद्गाटन करण्यासाठी गेले होते. या कार्यक्रमानंतर अजरबैजानहून रईसी परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यांचं हेलिकॉप्टर बेल 212 क्रॅश झालं. रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. अन्य दोन हेलिकॉप्टर सुरक्षित आहेत. पण रईसी यांचं हेलिकॉप्टर पूर्णपणे नष्ट झालं. अजरबैजान इराणचा शेजारी देश आहे. पण त्यांचे तेहरानचा कट्टर दुश्मन इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत. हमास आणि इस्रायल युद्धा दरम्यान अजरबैजानने इस्रायलची मदत केली होती. इराणचे राष्ट्रपती शेवटचे अजरबैजानमध्ये होते. त्यामुळेच दुर्घटनेनंतर मोसादवर संशय व्यक्त केला जातोय.
मोसादची ताकद काय?
इंस्टीट्यूट फॉर इंटेलिजेंस एंड स्पेशल ऑपरेशन्स इस्रायलची गुप्तहेर संस्था आहे. याला मोसाद म्हटलं जातं. मोसाद अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA नंतर जगातील दुसरी ताकदवर गुप्तहेर संघटना आहे. मोसाद संपूर्ण जगात सिक्रेट ऑपरेशन्ससाठी ओळखली जाते. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असला, तरी त्याला शोधून संपवण्याची मोसादमध्ये क्षमता आहे. मोसादची स्थापना 13 डिसेंबर 1949 रोजी झाली. मोसादचे अनेक विभाग आहेत. मोसादचे डायरेक्टर इस्रायल डिफेंस फोर्सेजमध्ये मेजर जनरल रँकच्या बरोबरीचे मानले जातात. मोसादचे चीफ डेविड बार्निया आहेत.