Lebanon Pager Blast : ज्यांच्या कारनाम्याने जग हैराण ते इस्रायलच खतरनाक यूनिट-8200 काय आहे?

What is Unit 8200 : लेबनानमध्ये पेजर बॉम्बस्फोट झाल्यानंतर संशयाची सुई सायबर वारफेयर यूनिट 8200 कडे वळली आहे. लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणल्याचा आरोप होतोय. इस्रायलच हे 8200 युनिट कसं काम करतं? त्यांनी आतापर्यंत काय-काय केलय? त्या बद्दल जाणून घ्या.

Lebanon Pager Blast : ज्यांच्या कारनाम्याने जग हैराण ते इस्रायलच खतरनाक यूनिट-8200 काय आहे?
What is Israel Unit 8200
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 1:16 PM

लेबनानमध्ये हिजबुल्लाह फायटर्सना पेजर आणि वॉकी-टॉकी बॉम्बस्फोटात उडवण्याचा सिलसिला सुरु आहे. 100 पेक्षा अधिक फायटर्स जखमी झालेत. 90 जणांना उपचारासाठी इराणला पाठवण्यात आलय. अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर संशयाची सुई इस्रायलच खतरनाक सायबर वॉरफेयर युनिट 8200 वर आहे. लेबनानमध्ये हल्ले याच युनिटने घडवून आणल्याचा आरोप होतोय. इस्रायल यावर मौन बाळगून आहे. ही योजना बनवण्यासाठी एकवर्षापेक्षा जास्त वेळ लागला, असं रॉयटर्स वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. यासाठी अचूक प्लानिंगची गरज होती. यात कथितरित्या युनिट 8200 च नाव घेतलं जातय. या हल्ल्यानंतर हिज्बुल्लाहची झोप उडालीय. इस्रायलच युनिट 8200 काय आहे? त्यांचं काम कसं चालतं? या बद्दल जाणून घ्या.

यूनिट 8200 हे इस्रायलयच सिक्रेट मिलिट्री युनिट आहे. ते इस्रायली डिफेंस फोर्सचा भाग आहे. हे इस्रायली सैन्याच सर्वात हायटेक युनिट आहे. कारण ते टेक्नोलॉजीने युद्ध लढतात. सायबर डिफेन्ससाठी काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सर्वात एडवान्स लेव्हलची टेक्निक ते वापरतात. इस्रायलला सायबर हल्ल्यापासून वाचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे. ते टेक्नोलॉजीच्या आधारे गोपनीय माहित मिळवतात.

कुठली माणसं या युनिटसाठी निवडली जातात?

युनिट 8200 च्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजेंसी (NSA) बरोबर होते. दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासह सायबर हल्ले करण्याची त्यांची क्षमता आहे. इस्रायलच्या या सीक्रेट युनिटचा भाग बनणं तितकं सोप नाहीय. यात टेक्नोलॉजीशी संबंधित इंटेलिजेंस एक्सपर्ट्सची भरती केली जाते.

ट्रेनिंगमध्ये काय शिकवतात?

हे युनिट वेगळ्या पद्धतीने विचार करतं. टेक्नोलॉजी स्पेशलिटी आणि काहीतरी नवीन करण्यावर फोकस करतं. यांच्या यूथ युनिटला हँकिंग, एन्क्रिप्शन आणि पाळत ठेवण्यासारखी कठीणात कठीण काम करण्याची ट्रेनिंग दिली जाते.

स्टक्सनेट वायरस हल्ला काय होता?

8200 युनिटचा कारभार इस्रायलच्या सीमेबाहेर पसरलेला आहे. अनेक हाय-प्रोफाईल सायबर ऑपरेशन्समध्ये या युनिटच नाव आलय. स्टक्सनेट वायरस हल्ला याच युनिटने घडवून आणल्याच बोललं जातं. स्टक्सनेट वायरस हल्ल्याने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच मोठं नुकसान केलं होतं. बरच मोठ यश मिळाल्यानंतरही यूनिट 8200 ला 7 ऑक्टोंबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेला हल्ला रोखता आला नव्हता. त्यासाठी त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. या युनिटच्या कमांडरने जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला होता.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.