Israel-iran: इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची इराणची योजना

इराण पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याआधी इराणने 13-14 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. मात्र, इराणने या दोन्ही हल्ल्यांना प्रत्युत्तराची कारवाई ठरवून त्यांना 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस' असे नाव दिले आहे. आता पुन्हा एकदा इराणकडून हल्ल्याची शक्यता आहे.

Israel-iran: इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची इराणची योजना
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 7:43 PM

इराण आणि इस्रायल यांच्यात सध्या संघर्षाची स्थिती आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले झाले आहेत. आता इराणने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ल्याची तयारी केली आहे. याआधी त्यांनी इशारा देखील दिला होता. आता इराण इस्रायलवर हल्ल्यासाठी तयारी करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, इराणने पाठवलेल्या राजनयिक संदेशात असे म्हटले आहे की, यावेळी तो त्या शस्त्रांचा वापर करणार आहे, ज्यांचा पूर्वीच्या दोन हल्ल्यांमध्ये वापर झाला नव्हता.

इराण यावेळी दुप्पट ताकदीने हल्ला करेल असा दावा करण्यात आला आहे. यासाठी इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रे डागणार आहे आणि तेहरान आपल्या 4थ्या पिढीतील क्षेपणास्त्र ‘खुर्रमशहर-4’ वापरणार असल्याची माहिती आहे. इराणच्या या क्षेपणास्त्राची रेंज सुमारे 2000 किलोमीटर आहे. तिच्यात 1500 ते 1800 किलो वारहेड वाहून नेण्याची क्षमता आहे. तर पृथ्वीच्या वातावरणात त्याचा वेग मॅक-8 आहे.

काही अहवालांमध्ये त्याची रेंज 4 हजार किलोमीटर असल्याचेही म्हटले आहे. येणारे काही तास इस्रायलसाठी खूप महत्त्वाचे असू शकतात. कारण मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की इराण अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखत आहे. अमेरिकेत मंगळवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजेपर्यंत ते सुरू राहणार आहे, अशा स्थितीत इराण मंगळवारी रात्रीच इस्रायलला प्रत्युत्तर देऊ शकेल असे मानले जात आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन मीडिया Axios च्या वृत्तातही दावा करण्यात आला होता की इराण इराकच्या भूभागातून इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी यापूर्वीच इराणला प्रत्युत्तराच्या हल्ल्याबाबत इशारा दिला आहे. इराणने आता इस्रायलवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात, इजिप्तच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की इराणने कैरोला वैयक्तिकरित्या कळवले आहे की यावेळी त्यांचा हल्ला अधिक मजबूत आणि अधिक प्राणघातक असेल. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या चार सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे इराणला आता बदला घ्यायचा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.