कमांडरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ईद आधी ‘हा’ देश इस्रायलवर करु शकतो हल्ला
सीरियाच्या राजधानीत एका दूतावासावर इस्रायलने एअर स्ट्राइक केला. या स्ट्राइकमध्ये मोठा कमांडर ठार झाला. त्यानंकर इस्रायल हाय अलर्टवर आहे. इस्रायलच्या नॅशनल सायबर डायरेक्टोरेटने देशात हल्ले होण्याचा इशारा दिला आहे.
मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो. इस्रायल-हमासमध्ये युद्ध सुरु असताना आणखी एक देश इस्रायलवर हल्ला करु शकतो. आपल्या कमांडरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इस्रायलवर कारवाई होऊ शकते. अलीकडच्या काही महिन्यात इस्रायलने या देशाला दुसरा धक्का दिलाय. त्यामुळे खवळलेल्या या देशाने बदला घेण्याची शपथ घेतलीय. त्यामुळे मिडिल ईस्टमध्ये युद्धाचा विस्तार होऊ शकतो. इस्रायलने अलीकडेच सीरियामध्ये इराणच्या दूतावासावर एअर स्ट्राइक केला. यात इराणी सैन्याचा मोठा कमांडर ठार झाला. आपण या कारवाईचा बदला घेणार, अशी घोषणा इराणने केलीय. इस्रायलच्या नॅशनल सायबर डायरेक्टोरेटने देशात सायबर हल्ले होऊ शकतात, असा इशारा दिला आहे.
5 एप्रिलला जेरूसलम डे होणार आहे. त्यानंतर इराणकडून 7 एप्रिलला हॅशटॅग #OpJerusalem आणि #OpIsrael मध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलय. या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून जगभरातील लोकांना इस्रायल विरुद्ध हल्ले सुरु करण्याच आवाहन करण्यात आलय. नॅशनल सायबर डायरेक्टोरेट असा अंदाज वर्तवलाय की, या दिवशी इस्रायलवर सायबर हल्ला होऊ शकतो. इस्रयालच्या इंटरनेट सेवेच नुकसान केलं जाऊ शकतं.
काही दिवसांनी जेरुसलेम डे
दरवर्षी जेरूसलम डे वर इस्रायलवर अशा प्रकारचे हल्ले होतात. इस्रायलने नेहमीच अशा हल्ल्यासाठी इराणवर आरोप केलाय. सीरियामध्ये इराणी दूतावासावर हल्ला झाला. त्यानंतर काही दिवसांनी जेरुसलेम डे आहे. यावेळी हा हल्ला जास्त क्षमतेने होऊ शकतो.