बदला घेणार म्हणजे घेणार, इस्रायलचा इराणवर कारवाईचा काय आहे प्लान?
इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी काय प्लान केला आहे याबाबत जगभरातील लोकांना चिंता आहे. कारण इस्रायलने आतापर्यंत जे काय केलंय ते कोणालाच आधी कळू शकलेलं नाही. इस्रायलने आपल्या शत्रूंच्या प्रमुखांचीच हत्या करुन त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता इराणवर बदला घेण्यासाठई काय कारवाई होऊ शकते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला इस्रायलकडून कधीही उत्तर दिले जाऊ शकते. इस्रायली लष्कर लवकरच याला प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती आहे. इस्रायल बदला घेणार हे स्पष्ट आहे. कारण त्यांनी आधीच सांगितले आहे की, जर प्रत्यूत्तर दिले नाही तर इस्रायल आणि इतर देशांसाठी देखील तो धोका असू शकतो. आता अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की, इस्रायल हा इराणच्या प्रमुख तेल उत्पादन केंद्रांना किंवा मोठ्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करु शकतो. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल. ऊर्जा सुरक्षेवर परिणाम झाला तर त्यांच्या अर्थव्यवस्थाच डगमळीत होईल. इस्रायली सैन्य इराणमध्ये गुप्त कारवाई देखील करू शकते अशी ही शक्यता वर्तवली जात आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, भारतातील इस्रायलचे राजदूत रुबिन रुबेन अझर म्हणाले की, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला आमची प्रतिक्रिया अत्यंत अचूक आणि धोरणात्मक असेल.’ रुबिन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर इराणच्या पाठीचा कणा मोडण्याचा इस्रायलचा प्लान असल्याचे संकेत मिळत आहेत. पण ते नेमकं कशाला लक्ष्य करतील हे कुणीही सांगू शकत नाही.
पायाभूत सुविधांना करणार लक्ष्य?
इस्रायलने जर त्यांच्या पायाभूत सुविधाच नष्ट केल्या तर इराणला त्यातून मोठी जखम होऊ शकते. इस्रायलने हवाई हल्ले केले तर याला रोखण्यासाठी इराणला आधीच योजना आखावी लागेल. इस्रायल इराणमध्ये गुप्त कारवाईचाही विचार करु शकतो. याआधी ही इस्रायलने आपल्या शत्रूंच्या प्रमुखांना टार्गेट करुन त्यांची हत्या केली होती. आधी हमास आणि त्यानंतर हिजबुल्लाहच्या प्रमुखांना इस्रायलने ठार केले आहे. आता इराणचे प्रमुख त्यांच्या निशान्यावर असण्याची शक्यता आहे. इराणमध्ये असताना हमास प्रमुख इस्माईल हनियाची हत्या इस्रायलने केली होती. त्यानंतर इराणच्या प्रमुखांची सुरक्षा वाढवली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
इस्रायल बदला घेण्यावर ठाम?
इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद कधी काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही. इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्याबाबत जी ७ देशांनी निषेध व्यक्त केला आहे. पण इस्रायलने संयम बाळगण्याचं आवाहन ही करण्यात आले आहे. पण इस्रायलने बदला घेणार असल्याचे आधीच म्हटले आहे. इस्रायल सामान्य लोकांच्या विरोधात नसल्याचे त्याने आधीच म्हटले आहे. म्हणजे तो लोक वस्तीवर हल्ला करणार नाही हे स्पष्ट आहे. इस्त्रायली पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या भाषणात असेही म्हटले होते की, इस्रायल सामान्य इराणी लोकांसोबत आहे.