जवळपास 50 वर्षांनंतर सीरियात घुसलं इस्रायलचं सैन्य, काय म्हणाले नेतन्याहू

इस्रायली लष्कराने 50 वर्षांनंतर सीरियामध्ये 10 किमी आत घुसून बफर झोन तयार केला आहे. सीरियातील लष्कराच्या चौक्या निकामी झाल्याचा फायदा घेण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. इस्त्रायली कमांडो आता सीरियाच्या भूमीवर आहेत. या ठिकाणी इस्रायलच्या पंतप्रधांनानाी देखील भेट दिली आहे.

जवळपास 50 वर्षांनंतर सीरियात घुसलं इस्रायलचं सैन्य, काय म्हणाले नेतन्याहू
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 4:07 PM

सीरियामध्ये सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. कारण अल कायदाशी संबंधित सुन्नी बंडखोर गट एचटीएसने देशाचा घेतला आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हे रशियात पळून गेले आहेत. या दरम्यान इस्रायलने सीरियाचे लष्करी तळ आणि रासायनिक शस्त्रांचे कारखाने हवाई हल्ले करून नष्ट केले आहेत. ही शस्त्रे बंडखोरांच्या हाती पडण्याची भीती अमेरिका आणि इस्रायलला होती. त्यामुळे दोघांनीही एकत्र कारवाई केली आहे. इस्रायली सैन्याने सीरियात प्रवेश केला. 1974 च्या करारानंतर इस्त्रायली सैन्याने सीरियाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. इस्त्रायली सैन्याने गोलान हाइट्सजवळ सीरियाच्या 10 किमीच्या आत एक बफर झोन देखील तयार केले आहे.

आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या हवाई दलाने सीरियात घुसून कारवाई केली आहे. हा हल्ला भीषण होता. असद राजवट संपल्याने सीरियातील इराणचा प्रभावही देखील संपला आहे. आता इराण यापुढे सीरियामार्गे लेबनॉनमधील हिजबुल्लाला शस्त्रे पाठवू शकणार नाही.

इस्रायलच्या लष्कराने रविवारी सीरियात घुसून 7 लष्करी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये खलखा एअर बेस आणि मिलिटरी बेसचाही समावेश आहे. या हल्लयात सीरियन लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलच्या सूत्रांचा दावा आहे की, इराण सीरियामध्ये शस्त्रास्त्रांची फॅक्टरी चालवत होता. त्याचे तज्ञ येथे क्षेपणास्त्रे विकसित करायचे. इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, बफर झोन तयार करण्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून इस्रायलच्या सीमेला लागून असलेल्या सीरियन गावकऱ्यांना तातडीचा ​​इशारा दिला गेला आहे.

जवळपास 50 वर्षांनंतर इस्रायलचं सैन्य सीरियात गेले आहे. ते म्हणाले की, आम्हाला कोणाचेही नुकसान करायचे नाही. सीरियाच्या ग्रामस्थांनी त्यांच्या घरातच राहावे. योम किप्पूर युद्धानंतर इस्रायलने 1974 मध्ये एक करार केला. ज्यानंतर इस्रायलच्या सैन्याने सीरियातून माघार घेतली होती आणि पुन्हा कधीही प्रवेश केला नाही. इस्त्रायली सैनिकांनी आता सीरियाच्या जमिनीवर बफर झोन उतार केले असून त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले आहे की, आम्ही आमच्या सीमेचे प्रथम संरक्षण करत आहोत. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या गोलान हाइट्सला नेतान्याहू यांनी भेट दिली. ते म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी झालेला करार आता मोडीत निघाला असून सीरियन सैनिक त्यांच्या चौक्यांवरून मागे गेल आहेत.

या भागात काही अज्ञात बंदूकधारी दिसल्याने इस्रायलने बफर झोन तयार केल्याचा दावा इस्रायलने केलाय. इस्त्रायलने अमेरिकेलाही याबाबत माहिती दिली आहे. असद सैन्य मागे गेल्याने इस्रायलचे सैन्य सीरियातील अधिक भाग आपल्या ताब्यात घेऊ शकते असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. इस्रायली हवाई दलाचे प्रसिद्ध शालदाग युनिटने सीरियामध्ये 10 किमी पर्यंत आत घुसून सीरियाचा हर्मोन पर्वत काबीज केला आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.