Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Attack on School : इस्रायलचा गाझामधील शाळेवर भीषण हल्ला, 100 पेक्षा जास्त ठार

Israel Attack on School : इस्रायलने आज सकाळी गाझामधील एका शाळेवर भीषण हल्ला केला. यात अनेक निरपराध नागरिक मारले गेले आहेत. इस्रायलकडून गाझा पट्टीतील इमारती, शाळांना लक्ष्य केलं जात आहे. हे युद्ध थांबण्याचे संकेत नाहीयत, उलट दिवसेंदिवस ते अधिक भीषण होत जाणार आहे.

Israel Attack on School : इस्रायलचा गाझामधील शाळेवर भीषण हल्ला, 100 पेक्षा जास्त ठार
Israel Attack (File Photo)Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 10:30 AM

हमास चीफ इस्माइल हानियाला संपवल्यानंतरही गाझा पट्टीत सुरु असलेलं युद्ध थांबणार नाहीय. उलट ते अजून भीषण बनत चाललय. इस्रायलने शनिवारी गाझा पट्टीतील एका शाळेवर हवाई हल्ला केला. यात 100 पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. पूर्व गाझामध्ये ही शाळा आहे. विस्थापित झालेले लोक या शाळेमध्ये राहत होते. रॉयटर्स आणि पॅलेस्टिनची न्यूज एजन्सी वाफाने ही माहिती दिली आहे. “लोकांची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. विस्थापित लोक या शाळेत राहत होते. फजर म्हणजे त्यांची सकाळची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो” असं हमासकडून चालवल्या जाणाऱ्या गाझामधील सरकारी मीडिया समूहाने म्हटलं आहे.

मागच्या आठवड्यात गाझामधील चार शाळांवर इस्रायलने हल्ले केले होते. 4 ऑगस्टला गाझामधील दोन शाळांवर इस्रायलयने हल्ले केले होते. गाझामधील विस्थापितांनी या शाळांमध्ये आश्रय घेतला होता. यात 30 जण ठार झाले होते. काही जखमी झालेले. त्याआधी 3 ऑगस्टला गाझामधील हमासच्या शाळेवर हल्ला झाला. त्यात 17 जणांना आपल्या प्राणांना मुकाव लागलेलं.

गाझा पट्टी पूर्णपणे बेचिराख

1 ऑगस्टला इस्रायलने दलाल अल शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला. यात 15 जण ठार झाले. गाझामधील इमारती, शाळांमध्ये लपून हमासचे दहशतवादी कारवाया करत आहेत. त्यामुळे या इमारतींना आम्ही लक्ष्य करतो, असं इस्रायलच म्हणणं आहे. मागच्यावर्षी ऑक्टोबरपासून इस्रायलच हमास विरुद्ध युद्ध सुरु आहे. हमासला संपवण्याचा संकल्प इस्रायलयने सोडला आहे. गाझा पट्टी पूर्णपणे बेचिराख झाली आहे. आता तिथे फक्त अवशेष उरले आहेत.

10 महिन्यात किती हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू?

मागच्यावर्षी 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. 1200 इस्रायलींची हत्या केली होती. 250 जणांना बंधक बनवलेलं. स्त्रियांवर अत्याचार केले. गर्भवती स्त्रियांची हत्या केली. या अमानुष हत्याकांडानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली. इस्रायलने हमास विरुद्ध युद्ध पुकारलं. मागच्या दहा महिन्यात या युद्धात 40 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.