आपल्या देशात परतण्यासाठी उत्सूक आहेत इस्रायली लोकं, सैन्यात व्हायचंय भरती
Israeli Tourist : इस्रायली लोकं जे सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. त्यांना आपल्या देशात जायचे आहे. आपल्या देशात जावून त्यांना सैन्यात भरती व्हायचं आहे. त्यांना आपल्या देशासाठी सेवा द्यायची आहे. सैन्यात सहभागी होऊन ते सध्या सुरु असलेल्या युद्धासारख्या परिस्थितीत आपल्या देशासाठी लढायचं आहे.
Israel – Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा आज चौथा दिवस आहे. इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायली लोकं आता आपल्या देशात परतण्यासाठी उत्सूक आहेत. इतर देशांमध्ये राहणाऱ्या इस्रायली लोकांना आता मायदेशी परतायचे आहे. आता त्यांना त्यांच्या देश इस्रायलमध्ये जाऊन सैन्यात भरती व्हायचे आहे. यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी इस्रायलची थेट उड्डाणे रद्द करून पर्यटकांना परत आणण्यासाठी सुरुवात केली आहे.
भारतातही मोठ्या प्रमाणात इस्रायली पर्यटक येत असतात. बहुतेक लोकं हे पहारगंजमधील हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. खबाद हे इस्रायली लोकांचे धार्मिक स्थळही आहे. जिथे मोठ्या संख्येने इस्रायली लोक जातात. अशा परिस्थितीत या लोकांच्या सुरक्षेचा विचार करून खबादच्या बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून इतर नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचारी येथे येणाऱ्या सर्व लोकांचे पासपोर्ट तपासत आहेत.
सैन्यात भरती होण्यासाठी उत्सूक
इस्रायली पर्यटक तोमरच्या म्हणण्यानुसार, त्याचे परतीचे फ्लाइट इस्तंबूल मार्गे इस्रायलला जाणार होते, परंतु कंपनीने कनेक्टिंग फ्लाइट रद्द केली, त्यानंतर त्याला भारत ते इस्तंबूलचे फ्लाइट देखील रद्द करावे लागले. अशा परिस्थितीत ते आता दिल्लीत अडकले आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले तोमर म्हणतात की, आपल्या देशात परतल्यानंतर गरज पडल्यास ते सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करतील.
इस्रायलने आपल्या लोकांना परत बोलावले
भारतात आलेल्या आणखी एका मुलीचे म्हणणे आहे की, ती तिच्या मैत्रिणींसोबत भारतात आली आहे, पण तिच्या अनेक मैत्रिणींना परत इस्रायलला बोलावून लष्करात भरती होण्यास सांगितले आहे. यासोबतच तिने सांगितले की, तिला परत जाऊन तिची दोन वर्षांची अनिवार्य सैन्य भरती पूर्ण करायची आहे.
इस्रायलमधील नागरिकांना सैन्यात सेवा देणे बंधनकारक
इस्रायलमध्ये सर्व नागरिकांसाठी, पुरुष आणि महिला दोघांनीही सैन्यात सेवा करणे अनिवार्य आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुरुषांना तीन वर्षे सैन्यात तर महिलांना दोन वर्षे सैन्यात सेवा द्यावी लागते. अशा परिस्थितीत तेथील सर्व नागरिक लष्कराच्या प्रशिक्षणात तज्ज्ञ आहेत.
भारताच्या पाठिंब्याचे स्वागत
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धात इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल इस्रायली नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि भारत सरकारच्या या पावलाचे स्वागत केले. हे लोक म्हणतात की त्यांना भारतात सुरक्षित वाटते.