इस्रायलचं इराणला उत्तर, 20 ठिकाणांवर 100 लढाऊ विमानांच्या मदतीने हल्ले
इराणच्या लष्करी तळावर अचूक हल्ले करण्यासाठी इस्रायलने आपल्या एडवान्स लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा वापर केलाय. हा हल्ला तीन टप्प्यात करण्यात आला. इस्रायलने हल्ल्यासाठी १०० लढाऊ विमानांचा वापर केला.
इराणने केलेल्या हल्ल्यानंतर 25 दिवसांनंतर इस्रायलने त्याला प्रत्तुतर देत बदला घेतलाय. आज सकाळी 100 इस्रायली लढाऊ विमानांनी इराणच्या 20 लष्करी तळांवर मोठा हल्ला केलाय. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन सुविधांवर हल्ला केला. इस्रायलने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन डेज ऑफ रिपेंटेंस’ असे नाव दिले होते. ज्याचा अर्थ हिब्रूमध्ये पश्चात्तापाचे दिवस असा होतो. इस्रायलने हे ऑपरेशन कसे केले ते जाणून घेऊया.
इराणच्या लष्करी तळावर इस्रायलने अचूक हल्ले करण्यासाठी विशेष लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांचा वापर केलाय. इराणवर केलेला हल्ला तीन टप्प्यात करण्यात आलाय. इस्रायलने हल्ल्यासाठी नव्या लढाऊ विमानांचा वापर केलाय.
इस्रायलने हल्ल्यासाठी खालील विमानांचा केला वापर
F-35 : हे लढाऊ विमान उभ्यानेच टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. त्याचा कमाल वेग ताशी 1975 किलोमीटर आहे. हे फायटर जेट जास्तीत जास्त 50 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते.
2. F-15I Ra’am : याचे खरे नाव F-15 स्ट्राइक ईगल असे आहे. याचा कमाल वेग २६५६ किमी/तास आहे. लढाऊ श्रेणी 1272 आहे आणि फेरी श्रेणी 3900 किलोमीटर आहे. जास्तीत जास्त 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते.
3. F16I ‘सुफा’: हे विमान उडवताना पायलटला कोणतेही बटण दाबण्याची गरज नसते. त्याला फक्त शत्रूकडे लक्ष द्यावे लागते. हेल्मेटमध्ये बसवलेल्या यंत्रणेद्वारे शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य नष्ट केले जाते. त्याची हेल्मेट यंत्रणा लढाऊ विमानाच्या रडार आणि शस्त्र प्रणालीशी जोडलेली असते.
हे तिन्ही लढाऊ विमाने सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर कापण्यास सक्षम आहेत. यामध्ये रॅम्पेज लाँग क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आलाय. जे हवेतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची अचूक सुपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 15 फूट लांब आहे. त्याचे वजन 570 किलो आहे. हे GPS ने लक्ष्य करता येतात. जे इराणच्या S-300 संरक्षण प्रणालीला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यासोबतच इस्रायलने सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि ‘रॉक्स’ क्षेपणास्त्राचाही वापर केला. ROCKS हे क्षेपणास्त्र इस्रायली कंपनी Rafael Advanced Defence System ने विकसित केले आहे. ROCKS हे अतिशन एडवान्स अले स्टँड-ऑफ रेंजचे क्षेपणास्त्र आहे.
तेलसाठ्याला लक्ष्य केले नाही?
इस्त्रायली सैन्याने इराणचे तेल साठे आणि अणू साठ्यांना लक्ष्य केलेले नाही. जर तसे झाले असते तर युद्ध आणखी भडकले असते. इस्रायलने हल्ल्यासाठी इराणचे लष्करी तळ निवडले. 100 लढाऊ विमानांच्या मदतीने इराणच्या 20 क्षेपणास्त्र ठिकाणांना लक्ष्य केले गेले. पहिल्या टप्प्यात इराणची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यासाठी रडारला लक्ष्य करण्यात आले. यानंतर लष्करी तळांवर सातत्याने क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
इस्रायलच्या हल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात इस्रायलने इराणच्या ड्रोन तळांना लक्ष्य केले. इस्रायली लढाऊ विमानांनी 25-30 च्या गटात हल्ले केले. यापैकी 10 जेट विमानांनी क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले, तर बाकीच्यांनी कव्हर दिले. या कारवाईदरम्यान इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई संरक्षण यंत्रणा प्रत्युत्तराच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी हाय अलर्टवर होत्या.