धक्यावर धक्के… इमरान खान आणि बुशरा यांचा विवाह बेकायदेशीर; निवडणुकीपूर्वीच खान दाम्पत्याला 7 वर्षाचा कारावास
निवडणुकीपूर्वी पाकिस्तानमध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. नुकताच इमरान खान यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर थेट सात वर्षांची शिक्षा आता कोर्टाकडून इमरान खान यांना सुनावण्यात आलीये. इमरान खान यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : इमरान खान यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. मतदानासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असतानाच आता इमरान खान याच्या अडचणीत वाढ झालीये. थेट सात वर्षांची शिक्षा ही इमरान खान यांना सुनावण्यात आलीये. हा इमरान खान यांना मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. थेट इमरान खान यांचा विवाहचे बेकायदेशीर असल्याने कोर्टाकडून सांगण्यात आलंय. आता या प्रकरणात थेट त्यांना सात वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली. आता मतदानापूर्वीच पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी या घडताना बघायला मिळत आहेत.
इमरान खान आणि बुशरा बीबी यांचा विवाह (निकाह) बेकायदेशीर घोषित केला आहे. आता इमरान खान याच्या अडचणीत अधिक वाढ झालीये. 2022 पासून विविध प्रकरणांमध्ये सतत इमरान खान यांना शिक्षा सुनावली जात आहे. इमरान खान यांना धक्यावर धक्के हे बसताना दिसत आहेत. यापूर्वीही एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा इमरान खान यांना सुनावण्यात आली.
हेच नाही तर अजून एक प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता सात वर्षांचीही शिक्षा सुनावण्यात आली. इमरान खान हे अगोदरच जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. म्हणजेच आतापर्यंत 31 वर्षांची जेलची शिक्षा ही इमरान खान यांना सुनावण्यात आलीये. बुशरा बीबी यांच्या पहिल्या पतीने इमरान खान आणि बुशरा बीबीच्या विवाह विरोधात कोर्टात धाव घेतली होती.
असा आरोप आहे की, इस्लामिक प्रथेचे उल्लंघन यांनी केले आहे. हेच नाही तर असाही आरोप आहे, इमरान खान आणि बुशरा बीबी यांच्यामध्ये लग्नापूर्वीच संबंध होते. या प्रकरणात तब्बल 14 घंटे सुनावणी सुरू होती, असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. फक्त हेच नाही तर 5 लाख रुपयांचा दंड देखील या प्रकरणात लावण्यात आलाय.
या सुनावणीदरम्यान इमरान खान आणि बुशरा बीबी दोघेही कोर्टात उपस्थित होते. इमरान खान यांना 5 आॅगस्टलाच अटक करण्यात आलीये. भ्रष्टाचाराचे काही आरोपही इमरान खान याच्यावर आहेत. अटॉक जेलनंतर आता इमरान खान यांना अदियाला जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलंय. सतत इमरान खान याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.