Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमासाठी काय पण! अखेर जपानच्या राजकुमारीने प्रियकराशी केले लग्न, 974 कोटींना लाथ; वाचा नेमकं प्रकरण

जपानची राजकुमारी माको (Mako) हिने मंगळवारी अखेर दिर्घ प्रतिक्षेनंतर तिच्या कॉलेजच्या प्रियकराशी लग्न केले. केई कोमुरो (Kei Komuro) हा राजघऱ्याणातला नसुन सानान्य जनतेतून येतो आणि माको ही जपानच्या राज्याची भाची आहे.

प्रेमासाठी काय पण! अखेर जपानच्या राजकुमारीने प्रियकराशी केले लग्न, 974 कोटींना लाथ; वाचा नेमकं प्रकरण
Japan princess Mako
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 7:41 PM

टोकियो: जपानची राजकुमारी माको (Mako) हिने मंगळवारी अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर तिच्या कॉलेजच्या प्रियकराशी लग्न केले. केई कोमुरो (Kei Komuro) हा राजघराणातला नसून सामान्य जनतेतून येतो आणि माको ही जपानच्या राजाची भाची आहे. त्यामुळे लग्न करण्यासाठी अनेक वर्ष विविध अडथळ्यांना त्यांना सामोरं जावं लागलं, ज्यामुळे राजकन्या माकोला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरचा (Post Traumatic Stress Disorder-PTSD) त्रास झाला होता. (japan princess mako finally marries her boyfriend komuro)

माको आणि केई कोमुरो, दोघेही 30 वर्षांचे असून, यांनी चार वर्षांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सुरुवातीला जपानने आनंद व्यक्त केला. पण मीडियाने जेव्हा कोमुरोच्या आईचा पैशांच्या घोटाळ्यांमध्ये समावेश असल्याचा बातम्या दिल्या, त्यानंतर त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. कोमुरोने 2018 मध्ये जपान सोडला आणि न्यूयॉर्कमध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी गेला, तो सप्टेंबरमध्ये जपानला परतला.

लग्न कसं झालं?

माको आणि कोमुरोच्या लग्नात फक्त इम्पेरियल हाऊसहोल्ड एजन्सी (IHA) चा एक अधिकारी होता, ज्याने आज सकाळी स्थानिक कार्यालयात कागदपत्रे सादर केली. राजघराण्याच्या विवाहसोहळ्यांतील असंख्य विधी, समारंभ आणि शाही रिसेप्शनसह (Royal Wedding Reception) सगळं वगळण्यात आले.

माकोचा 974 कोटी घ्यायला नकार

जपानी कायद्यानुसार राजघऱ्याणातल्या महिलेनी जर सामान्य नागरिकाशी लग्न केलं, तर त्या महिलेचा सामान्य नागरिकांमध्ये समावेश होतो. अशा महिलेला साधारणत: $1.3 दशलक्ष डॉलर्स (974.35 कोटी रुपये) रक्कम दिली जाते. पण माकोने ही रक्कम घ्यायला नकार दिला. माकोने लग्नात मोती पेस्टल ड्रेस परिधान केला होता. दुपारी माको आणि तिचा नवरा एक पत्रकार परिषद घेणार आहे, पण हे प्रथेला अनुसरून नाही.

पैसा घोटाळा

माको आणि कोमुरो दोघांनी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती आणि जपानच्या जनतेने आनंदाने त्याचं स्वागत केलं. पण काही महिन्यांनंतर एका व्यक्तीने दावा केला की, कोमुरोच्या आईने आणि तिच्या आधीच्या प्रियकराने सुमारे $35,000 डॉलर्सचे (26.24 लाख रुपये) कर्ज फेडले नाहीये. IHA ने या घोटाळ्याचं नीट स्पष्टीकरण नाही दिले आणि ही बातमी सर्व माध्यमांमध्ये पसरली. 2021 मध्ये कोमुरोने या प्रकरणावर 24 पानांचे निवेदन जारी केले आणि तो सेटलमेंट देईल, असंही सांगितलं. पब्लिक पॉल्समध्ये असं दिसून आलं की जपानी लोकांची मतं या लग्नाबद्दल विभागलेले होते आणि निषेधही झाला होता.

इतर बातम्या

Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?

China Covid Updates: धोका वाढला! चीनमधील ‘या’ पर्यटनस्थळावर बंदी

japan princess mako finally marries her boyfriend komuro

शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.