नोकरी सोडून गॅरेजमध्ये काम, आता जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, वाचा एक प्रेरणादायी कहाणी
एका तरुणाने इतरांप्रमाणेच इंजिनिअरिंग केली आणि अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. इतकंच नाही तर नोकरीदरम्यान त्याने अमेरिका पालथी घातली.
नवी दिल्ली : आपल्या कष्टानं सगळं काही जिंकता येत हे खरं आहे. याचंचं एक उत्तम आणि प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे. एका तरुणाने इतरांप्रमाणेच इंजिनिअरिंग केली आणि अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. इतकंच नाही तर नोकरीदरम्यान त्याने अमेरिका पालथी घातली. यावेळी लोकांना वस्तू खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. इंटरनेटचं उत्तम ज्ञान असल्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि इंटरनेटच्या माध्यामातून ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरू केला. (true motivational stories jeff bezos to step down as ceo of amazon know the inspiring of world richest man)
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्याने नोकरी सोडून घरच्यांसोबत गॅरेजमध्येच काम सुरू केलं. सुरुवातीला त्याने पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. खरंतर, सध्या ऑनलाईन शॉपिंग किती महत्त्वाची झाली आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा या तरुणाने पुस्तकांची विक्री सुरू केली. तेव्हा मात्र हे सगळं ग्राहकांसाठी नवीन होतं. अखेर हळूहळू लोकांचा ऑनलाईनकडे कड वाढला.
1994 मध्ये तरुणाने आपल्या कंपनीची पायाभरणी केली. सध्या ही कंपनी ऑनलाईन विश्वातली सगळ्यात टॉपची कंपनी म्हणून काम करत आहेत. 16 जुलै 1995 पासून घरोघरी पुस्तकांची विक्री केली. सप्टेंबर 1995 पर्यंत अथक परिश्रम घेतले. याचं फळ म्हणजे दर आठवड्याला 20,000 डॉलर्सची विक्री सुरू झाली. व्यवसाय अगदी जोमाने सुरू झाला.
या यशामुळेच आज जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत त्यांचं नाव पहिल्या नंबरवर आहे. हे नाव म्हणजे जेफ बेझोस. त्यांची कंपनी अॅमेझॉनने गॅरेजपासून सुरवात केली आणि आज सगळ्यात टॉपची कंपनी म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.
जेफ बेझोस सोडू शकतात आपलं पद
अॅमेझॉनला यशात्या एवढ्या मोठ्या शिखरापर्यंत आणल्यानंतर जेफ आता पद सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी जेफ बेझोस हे पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. Amazon.com Inc ने दिलेल्या माहितीनुसार, जेफ यांना आता इतर काही गोष्टींवर लक्ष द्यायचं असल्याने ते पद सोडणार आहे. इतकंच नाही तर बेझोसची जागा अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) ची चीफ एक्झिक्युटिव्ह अँडी जेसी घेणार असल्याचं सागंण्यात येत आहे. यानंतर जेफ बेझोस आता मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील.
एका मुलाखतीवेळी जेफ म्हणाले की, मी नोकरी याच्यासाठी सोडली होती की वयाच्या 80 व्या वर्षी मला नोकरी सोडण्याचं वाईट वाटता कामा नये. 1994 मध्ये सुरु केलेल्या कंपनीचं ना त्यांनी केडेब्रा डॉट कॉम ठेवलं होतं. पण त्यानंतर 3 महिन्यातच त्यांनी नाव बदलून अॅमेझॉन डॉट कॉम असं ठेवलं.
सुरुवातीला अवघ्या 3 कम्प्यूटरवरून ऑनलाईन विक्रीला सुरुवात झाली. यासाठी बेझोसने स्वत: ऑनलाइन विक्री सॉफ्टवेअर तयार केलं होतं. या सगळ्यात त्याच्या कुटुंबानेही त्यांना मदत केली. या बिझनेसाठी त्याच्या कुटुंबाने त्याला जवळपास तीन लाख डॉलर्सची मदत केली होती. जेव्हा कंपनीची स्थापना झाली तेव्हा त्यांच्या वडिलांनी ‘इंटरनेट म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला होता. पण आज याची व्याख्या आपण सगळेच जाणतो.
2005 मध्ये झाला नफा
1995 मध्ये कंपनीला 1.64 कोटी रुपयांचा फायद्यासह 0.96 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. यानंतर 2000 मध्ये कंपनीला 11,868 कोटी रुपयांचा फायदा झाला आमि 0.96 कोटींचं नुकसान झालं होतं. पण 2005 मध्ये कंपनीने बक्कळ पैसा कमवला. यानंतर आजपर्यंत कंपनी यशाच्या शिखरावर आहे. या कंपनीने पहिल्यांदा सलग तीनवेळा रेकॉर्ड मोडला आणि तिमाही विक्री किंवा $ US100 अब्ज डॉलर्स ($ 130 अब्ज) पेक्षा जास्त नोंदवलेली आहे.
2007 मध्ये कंपनीने महत्त्वाचा टप्पा पार केला. जेव्हा त्यांनी किन्डल नावाने ई-बुक रीडर बाजारात आणलं. याच्या माध्यमातून कोणतंही पुस्तक डाऊनलोड करून तात्काळ वाचता येऊ शकतं. यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. गेल्या वर्षी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार अॅमेझॉन फाउंडरची संपत्ती 155 अब्ज डॉलर्स होती. (true motivational stories jeff bezos to step down as ceo of amazon know the inspiring of world richest man)
संबंधित बातम्या –
जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?
VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना
(true motivational stories jeff bezos to step down as ceo of amazon know the inspiring of world richest man)