आफ्रिकन देशांसाठी भारताचं मोठं पाऊल, केविन पीटरसनही भारावला, भारतीयांचं कौतुक करत नरेंद्र मोदींचे मानले आभार
केविन पीटरसननं भारताचा सह्रदय लोकांचा देश म्हणून भारताचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यानं मानले आहेत.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉन वेरिएंटच्या (Omicron) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालत असताना भारत मात्र संकटाच्या काळात आफ्रिकन देशांच्या पाठिशी उभा राहिला आहे. भारत सरकारनं ओमिक्रॉननं प्रभावित झालेल्या आफ्रिकन देशांना कोरोना प्रतिबंधक लस, पीपीई किट आणि इतर साहित्य पुरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचं क्रिकेटपटू केविन पीटरसन यानं स्वागत केलं आहे. केविन पीटरसननं भारताचा सह्रदय लोकांचा देश म्हणून भारताचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यानं मानले आहेत.
केविन पीटरसनचं ट्विट
केविन पीटरसन यानं इंग्लंडकडून क्रिकेट खेळलं असलं तरी तो मूळचा आफ्रिकन आहे. भारतानं पुन्हा एकदा संवेदना दाखवली आहे. भारत हा सह्रदय लोकांचा शानदार देश आहे. थँक्यू नरेंद्र मोदी, असं ट्विट पीटरसननं केलं आहे.
That caring spirit once again shown by India! The most fabulous country with so many warm hearted people! Thank you! cc @narendramodi ?? https://t.co/r05631jNBD
— Kevin Pietersen? (@KP24) November 29, 2021
आफ्रिकन देशांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय
ओमिक्रॉनचा वेरिएंट समोर आल्यानंतर पाश्चिमात्य प्रगत देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातल्याचं समोर आलं होतं. भारतानं मात्र आफ्रिकन देशांना संयुक्त राष्ट्राच्या कोवॅक्स कार्यक्रमातंर्गत कोरोना प्रतिंबधक लसींचा पुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. कोविशिल्ड लसीचा पुरवठा मालावी, इथिओपिया, झांबिया, मोझाम्बिक यासह इतर देशांना करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. तर, बोट्सवाना देशाला कोवॅक्सिन लसीचा पुरवठा केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं आहे.
कोरोना प्रतिबंधक लसी आणि पीपीई किटचा पुरवठा करणार
ओमिक्रॉनचा सामना करणाऱ्या आफ्रिकन देशांना भारत सरकार देशात तयार होणाऱ्या कोरोना प्रतिंबंधक लसी, पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं आहे. तर, भारतानं आतापर्यंत आफ्रिकेतील 41 देशांना 25 दशलक्ष कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे. एकीकडे आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचं काम सुरु असताना आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी उभं राहणं आपली जबाबदारी असल्याच परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं सागंण्यात आलं आहे.
इतर बातम्या:
पुण्यात पुन्हा निर्बंध, चित्रपट गृह, नाट्यगृहांमध्ये पूर्वीप्रमाणे 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश
ओमिक्रॉनची भीती, मुंबईतील पहिली ते चौथीचे वर्ग बंद राहणार, BMC चा मोठा निर्णय
Uddhav Thackeray | ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध लावण्याबाबत मुख्यमंत्री करणार मोदींशी चर्चा
Kevin Pietersen thanks India and PM Narendra Modi after MEA announced help for African nations