मोस्ट वाँटेड खालिस्तानी दहशतवाद्याची गुरुद्वाराबाहेरच गोळी घालून हत्या; 10 लाखांचे होते बक्षीस

भारतातील मोस्ट वाँटेड खालिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कॅनडा येथे एका गुरुद्वारा बाहेरच त्याच्यावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घातल्या आहेत.

मोस्ट वाँटेड खालिस्तानी दहशतवाद्याची गुरुद्वाराबाहेरच गोळी घालून हत्या; 10 लाखांचे होते बक्षीस
hardeep singh nijjarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:35 AM

ओटावा : भारतातील मोस्ट वाँटेड खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. कॅनडाच्या सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वाराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. दोन अज्ञात बाईकस्वारांनी निज्जर याला गोळ्या घातल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. निज्जरला गोळ्या घातल्यानंतर दोन्ही बंदूकधारी फरार झाले. मोस्ट वाँटेड खालिस्तांनी म्हणून भारताने त्याला घोषित केलं होतं. त्याच्यावर भारताने 10 लाखांचे बक्षीस लावले होते.

हरदीप सिंग निज्जर हा कॅनडातील शीख फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख होता. तो खालिस्तानी टायगर फोर्सचा प्रमुखही होता. तो कॅनडात बसून भारताच्या विरोधात कारवाया करत होता. तो मूळचा पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील राहणारा होता. सध्या भारतीय तपास यंत्रणा कॅनडाच्या तपास यंत्रणाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

हे सुद्धा वाचा

पुजारी हत्येने चर्चेत

पंजाबच्या जालंधरमध्ये 2021मध्ये हरदीप सिंग निज्जर यांनी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केली होती. त्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने पंजाबमधील अनेक कारवायात त्याचा सहभाग होता. गेल्यावर्षी एनआयएने हरदीप सिंग निज्जर याच्यावर 10 लाखाचं बक्षिस घोषित केलं गेलं होतं. त्याला मोस्ट वाँटेड अतिरेकी म्हणूनही घोषित करण्यात आलं होतं. भारताने 40 मोस्ट वाँटेड अतिरेक्यांची यादी जाहीर केली होती. त्यात त्याचं नाव होतं.

कॅनडातून कारवाया

निज्जर गेल्या काही वर्षापासून कॅनडात राहत होता. तिथूनच तो भारताच्या विरोधात कारवाया करत होता. तसेच खालिस्तानी चळवळीला बळ देण्याचं कामही करत होता. गेल्या वर्षभरापासून तर तो भारतीय तपास यंत्रणांची डोकेदुखी बनला होता. कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडाना लॉजिस्टिकसाठी रसद पुरवण्याचं काम सुरू केलं होतं. निज्जरच्या दोन सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. फिलिपाईन्स आणि मलेशियातून त्यांना अटक करण्यात आली होती.

फरार म्हणून घोषित

त्याने 2022मध्ये जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केली होती. या हत्येचं षडयंत्र रचण्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे त्याच्यावर दहा लाखाचा इनाम घोषित केला होता. त्याला फरार म्हणूनही घोषित करण्यात आळं होतं. भारतात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं, त्यावेळी भारतीय दुतावासासमोर खालिस्तांनी संघटना शीख फॉर जस्टिसच्या अतिरेक्यांनी जोरदार निदर्शने केली होती. भारताच्या विरोधात भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप होता. एनआयएच्या एफआयआरमध्येही त्याचे नाव होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.