भावापेक्षा बहिण डेंजर, किम जोंगच्या बहिणीची अधिकाऱ्यांना जबर शिक्षा

Kim Jong Un sister : किम जोंग उनची (Kim Jong Un) क्रूरता जगाला माहिती आहे. पण त्याची बहिणही तितकीच डेंजर असल्याचं तिच्या कारनाम्यावरुन दिसत आहे.

भावापेक्षा बहिण डेंजर, किम जोंगच्या बहिणीची अधिकाऱ्यांना जबर शिक्षा
Kim Yo Jong
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:26 PM

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा (North Korea) शासक किम जोंग उनची (Kim Jong Un) क्रूरता जगाला माहिती आहे. पण त्याची बहिणही तितकीच डेंजर असल्याचं तिच्या कारनाम्यावरुन दिसत आहे. अमेरिकेला खुली धमकी देणारी किम यो जोंगने (Kim Jo Yong) आपल्या देशाविरोधात आवज उठवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. त्यासाठी तिने अत्यंत क्रूर पावलं उचलली. किम योने (Kim Jong Un sister) थेट ‘सफाई अभियान’ हाती घेऊन, देशविरोधी आवाज बंद केला. तिने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी शिक्षा सुनावली, ज्याने उत्तर कोरिया हादरुन गेला. (Kim Jo Yong sister of Kim Yo Jong Uttar Korea ordered to kill top officers)

किम यो जोंगने सरकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याचे फर्मान सोडलं आहे. एका एका अधिकाऱ्याला समोर बोलावून गोळ्या घालून त्याच्या शरिराची चाळण केली जात आहे. रेडियो फ्री एशियाने (RFA) दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली. उत्तर कोरियात सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याचं प्रकरण चर्चेत आहे.

प्योंगयांगमध्ये मारलेला अधिकारी कोण हे गुलदस्त्यात ठेवलं असलं, तरी किम जोंग उनच्या बहिणीच्या आदेशावरुनच या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मागील वर्षीही कठोर शिक्षा

किम यो जोंगने केलेलं हे हत्याकांड पहिलंच आहे असं नाही. मागील वर्षीही नोव्हेंबर महिन्यात तिने अशाच क्रूर शिक्षा दिल्या होत्या. उत्तर कोरियात सोन्याच्या तस्करीचं प्रकरण उजेडात आलं होतं. त्यावेळी तिने सीमा सुरक्षा दलाच्या दहा जवानांना थेट गोळ्या घातल्या होत्या. इतकंच नाही तर 9 जणांना आयुष्यभरासाठी जेलमध्ये डांबण्यात आलं.

विरोधी आवाज दाबला

किम यो जोंगचा पक्ष सध्या विरोधी आवाज उठवणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती करत आहे. तिने आपल्या भावालाही त्याची माहिती देत, विरोधी सूर थेट ठार केले जातील, असं सांगितलं. दरम्यान, किम जोंग उनच्या बहिणीविरोधातही आता उत्तर कोरियात आवाज उठत आहे. किम यो जोंगच्या आदेशानेच त्यांचा पक्ष सर्व सरकारी अधिकाऱ्यांची समीक्षा करत आहे. जेणेकरुन आपल्या विरोधात कोण षडयंत्र रचत आहे, त्याची माहिती मिळेल. अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्याबरोबरच अनेकांना जन्मठेपेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या  

हुकुमशाह किमच्या बहिणीचा थेट अमेरिकाला इशारा, ‘4 वर्षे शांतपणे झोपायचं असेल, तर स्फोटकांच्या दुर्गंधीपासून दूर राहा’

PHOTO : जगातील सर्वाधिक हिंस्र 8 हुकुमशाह, कुणी किती माणसांच्या हत्या केल्या?    

अमेरिकेने गायब केल्याचा आरोप, हुकूमशाह किम जोंगचा पुतण्या हान सोल कोण आहे?   

(Kim Jo Yong sister of Kim Yo Jong Uttar Korea ordered to kill top officers)

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.