उत्तर कोरियात आता काळ्या लेदर कोटवर बंदी, सनकी किमच्या सरकारने हा निर्णय का घेतला, वाचा सविस्तर!

उत्तर कोरियामध्ये कुठल्याही प्रकारचे लेदरचे जॅकेतट विकले जाणार नाही, ना ते कुणाला खरेदी करता येणार आहे. लेदर जॅकेट जवळ बाळगणंही गुन्हा मानला जाणार आहे. गेल्या काही वर्षात उत्तर कोरियात लेदर जॅकट घालण्याचं मोठं फॅड आलं होतं

उत्तर कोरियात आता काळ्या लेदर कोटवर बंदी, सनकी किमच्या सरकारने हा निर्णय का घेतला, वाचा सविस्तर!
काळ्या लेदर जॅकेटमध्ये किम जोंग उन
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 11:44 AM

उत्तर कोरिया, एक असा देश जिथं एक सनकी शासक आहे, आणि गेली कित्येक वर्ष पारतंत्र्यात असलेली जनता. ना इंटरनेट, ना चित्रपट पाहण्याचं स्वातंत्र, ना सरकारविरोधात बोलण्याची परवानगी. फक्त किम जोंग उनचा उदोउदो करायचा आणि तो म्हणेल तर वागायचं. आता याच पारतंत्र्यात असलेल्या जनतेवर आणखी एक जुलमी आदेश लादण्यात आला आहे. तो आदेश आवडते कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावरचा. आता उत्तर कोरियात लेदर जॅकेट घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, आता कुणी जॅकेट घालणारच नसेल तर विक्रीचा तर प्रश्नच सोडा. पण असं का झालं हेच आपण समजून घेऊया. ( Kim Jong-un North korea bans leather coats to stop citizens copying kim jong uns look)

यापुढे उत्तर कोरियामध्ये कुठल्याही प्रकारचे लेदरचे जॅकेतट विकले जाणार नाही, ना ते कुणाला खरेदी करता येणार आहे. लेदर जॅकेट जवळ बाळगणंही गुन्हा मानला जाणार आहे. गेल्या काही वर्षात उत्तर कोरियात लेदर जॅकट घालण्याचं मोठं फॅड आलं होतं, हे सगळे जॅकेट चीनमधून आयात होत होते. मात्र, जॅकेटची मागणी वाढलेली पाहून आता सनकी किमच्या सरकारने यावर बंदी आणली आहे. पण यामागे एक वेगळं कारणंही आहे.

पण खरं कारण काय?

किस्सा 2019 चा..खरं म्हणजे, उत्तर कोरियाचा सनकी शासक किम जोंग उन एका कार्यक्रमादरम्यान लेदर ट्रेंच कोट घेऊन गेला. आता किमने हा कोट घातला, आणि अख्ख्या देशाने त्याला पाहिलं…काळ्या लेदर जॅकेटमध्ये किमला पाहून लोकांना भारी वाटलं…आपल्याकडे एखाद्या सेलिब्रेटीला पाहतात ना अगदी तसंच…मग काय तो पोषाख ट्रेंड होणारच. आपल्याकडेही मोदी जॅकेट जसं फेमस झालं होतं, अगदी तसंच. लोकांनाही हा काळा लेदर कोट आवडला आणि त्यांनीही या कोटची खरेदी सुरु केली, त्यामुळे एकाएकी उत्तर कोरियाच्या बाजारात या कोटची मागणी वाढली, चीनमधून हे कोट आयात होऊ लागले. आता जनता जर राजाची बरोबरी करत असेल, तर ते राजाला थोडीच पटणार, आणि त्यातल्या त्यात खुर्चीवर किम सारखा सनकी बसला असेल तर विचारुच नका. मग काय आदेश निघाला, आणि काळा कोट जनतेसाठी कायमचा बंद झाला.

कोरियातील लोक निराश

रेडिओ फ्री एशियाशी बोलताना तिथली एक व्यक्ती म्हणाली – मी तुम्हाला सांगतो की, ही गोष्ट या वर्षातील आहे. जेव्हा त्याच्या बहिणीने चामड्याचा ट्रेंच कोट घातला होता. याशिवाय कोरियातील शक्तिशाली लोकही ते घालत असत. आता हा नियम लागू झाल्यापासून सर्वांनी तो मान्य केला. सरकारच्या या निर्णयामुळे इथले लोक खूप निराश झाले आहेत, कारण त्यांना ते फॅशनेबल कपडे घालायला आवडतात. पण आता इथले लोक असे कोट घालत नाहीत आणि कोणी विकतही नाहीत.

भिती कोटची नाही, विद्रोहाची!

आता किमचं सरकार त्याबद्दल कारण देताना म्हणतं, की काळा कोट घालणं ही किम जोंग उनची बरोबरी करण्यासारखं आहे, हा त्यांचा अपमान आहे, त्यामुळे जनतेने काळा कोट घालू नये. हे खरंही आहे, किम सारख्या सनकीची बरोबरी होऊच शकत नाही. पण फक्त काळा कोट घातल्याने कुणाच्याही अंगात ही सनक शिरेल असंही नाही ना. पण काय करणार, किमला ते थोडीच पटणारं आहे, जनतेहूनही अधिक भिती किमला वाटते, त्यामुळेच विद्रोहाची ठिणगीही तो पडू देत नाही, मग तो कोट असो वा दक्षिण कोरियायी चित्रपट.

हेही वाचा:

नशीब असावं तर विलीसारखं, 7 वर्षात दोनदा लॉटरी लागली, मिळाले तब्बल इतके कोटी…!

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.