कशी होते अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई?; ट्रम्प यांची हकालपट्टी होणार?
अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला आहे. (know about process of impeachment against united states president)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मंजूर झाला आहे.आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात येईल. तसं झाल्यास महाभियोगाद्वारे पदावरून हटवण्यात आलेले ट्रम्प हे पहिलेच अमेरिकन राष्ट्रपती ठरणार आहेत. अमेरिकेतील महाभियोगाची प्रक्रिया काय असते? याचा घेतलेला हा आढावा. (know about process of impeachment against united states president)
गंभीर गुन्ह्यांबद्दल महाभियोग
अमेरिकन घटनेच्या आर्टिकल II, सेक्शन 4 नुसार महाभियोगाची प्रक्रिया केली जाते. राष्ट्रद्रोह, चिथावणी देऊन देशांतर्गत सशस्त्र उठाव घडवून आणणे, लाच आणि इतर गंभीर गुन्ह्याप्रकरणी अमेरिकन राष्ट्रपतीला महाभियोगाचा सामना करावा लागतो. महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ही कारवाई केली जाते.
कनिष्ठ सभागृहातून प्रक्रिया
अमेरिकेत राष्ट्रपतीविरोधात महाभियोग चालवण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (कनिष्ठ सभागृहात) प्रस्ताव ठेवावा लागतो. कनिष्ठ सभागृहात या प्रस्तावावर चर्चा होते. त्यानंतर मतदान घेऊन प्रस्ताव मंजूर केला जातो. त्यानंतर हा प्रस्ताव सीनेटकडे पाठवला जातो. सीनेटमध्ये त्यावर एक सुनावणी होते. सीनेटमध्येही महाभियोग प्रस्तावावर मतदान होतं. मात्र, एक तृतीयांश बहुमत असेल तरच त्याला मंजुरी मिळते.
तिसरे राष्ट्रपती
महाभियोगाचा सामना करावे लागणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील तिसरे राष्ट्रपती आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून हटवण्यात आलेले नाही. यापूर्वी 1868 मध्ये अँड्र्यू जॉन्सन यांच्याविरोधात महाभियोग आणण्यात आला होता. एका सरकारी अधिकाऱ्याला बेकायदेशीरपणे बरखास्त केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मात्र त्यावेळी केवळ एका मताने त्यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव टळला होता. त्यानंतर 130 वर्षानंतर म्हणजे 1998मध्ये तत्कालीन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. मोनिका लेवेन्स्कीने त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. दोन्ही प्रकरणात दोन्ही राष्ट्रपतींवर कारवाई झाली नाही. त्यांनी त्यांचा कार्यकाळही पूर्ण केला होता. 1974मध्ये प्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणात रिचर्ड निक्सन यांच्याविरोधातही महाभियोग चालवला गेला असता पण त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता.
दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करणारे ट्रम्प पहिले
यापूर्वी 2019मध्येही ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. युक्रेनमधील व्यवहारांच्या संदर्भात सत्तेचा दुरूपयोग आणि संसदेच्या कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात हा महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावेळी कनिष्ठ सभागृहात 229 सदस्यांनी महाभियोग चालवण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. तर 197 सदस्यांनी त्याविरोधात मतदान केलं होतं. कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅट्सचं बहुमत असल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, सीनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं स्पष्ट बहुमत असल्याने तिथे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याने ट्रम्प हे दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करणारे पहिलेच अमेरिकन राष्ट्रपती ठरले आहेत.
ट्रम्प यांना कसे हटवणार?
>> आधी सहा हाऊस समित्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात चौकशी करण्याबाबतचं आपलं मत न्यायिक समितीला पाठवलं. >> महाभियोग चालवण्यासाठी कमिटीचं मत पुरेसं असल्याने महाभियोगाच्या एका कलमानुसार सभागृहात मतदान घेतलं गेलं. >> सभागृहात महाभियोग चालवण्याच्या बाजूने मतदान झाल्याने महाभियोग सुरू होणार आहे. >> आता हे प्रकरण सीनेटमध्ये जाईल. तिथे ट्रम्प यांच्याविरोधात ट्रायल सुरू होईल. >> ट्रायलनंतर ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी मतदान होईल. जर दोन तृतियांश बहुमताने ट्रम्प यांना दोषी ठरवल्यास ट्रम्प यांना पदावरून हटवलं जाईल. (know about process of impeachment against united states president)
डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदीhttps://t.co/f26HQuWzGT#DonaldTrump | #youtubechannel | #USCapitol | #JoeBiden
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 13, 2021
संबंधित बातम्या:
Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर
ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?
जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..
डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी
(know about process of impeachment against united states president)