कोरोना लसीसाठी अनेक देश रांगेत उभे, मग हाँगकाँग लाखों लसी कचरा कुंडीत का टाकत आहे?
भारतासह जगभरातील अनेक देश कोरोना लस (Corona Vaccine) मिळावी म्हणून रांगेत उभे आहेत. दुसरीकडे हाँगकाँग लाखो लसी कचऱ्याच्या कुंडीत टाकण्याच्या मार्गावर आहे.
हाँगकाँग : भारतासह जगभरातील अनेक देश कोरोना लस (Corona Vaccine) मिळावी म्हणून रांगेत उभे आहेत. या देशांमध्ये कोरोना लसींचा मोठा तुटवडा आहे. आफ्रीकेत तर अनेक देशांना कोरोना लस मिळालेली नाही. अशा स्थितीत भारताचा शेजारी देश लाखो कोरोना लस (Coronavirus) कचरा कुंडीत टाकण्याच्या तयारीत आहे. हाँगकाँग (Hong Kong) आपल्याकडील लाखो कोरोना लसी फेकणार आहे. यामागील कारण आहे या लसींची जवळ येणारी एक्स्पायरी डेट. याबाबत हाँगकाँगच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी (25 मे) इशारा दिलाय (Hong Kong will throw millions of unused Covid-19 vaccine doses).
हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, “कोरोना लस घेण्यासाठी पुरेशा प्रमाणात लोक नोंदणीच करत नाहीयेत. त्यामुळेच कोरोना लसींची एक्सपायरी जवळ येऊनही लसी शिल्लक आहेत. हाँगकाँग त्या निवडक ठिकाणांपैकी एक आहे जेथे गरजेपेक्षा अधिक कोरोना लसी उपलब्ध आहेत. या भागाची लोकसंख्या जवळपास 75 लाख आहे. मात्र, ऑनलाईन सुरु असणाऱ्या अफवा आणि सरकारकडून शहराला कोरोनामुक्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये होत असलेला हलगर्जीपणा यामुळे लोक लस घेण्यास पुढे येताना दिसत नाही.
केवळ 3 महिन्यांची मुदत, अन्यथा लाखो लसी कचऱ्याच्या कुंडीत
हाँगकाँग सरकारच्या व्हॅक्सीन टास्क फोर्सच्या एका सदस्याने इशारा दिलाय, “आपल्याकडे उपलब्ध कोरोना लसींची मर्यादा पुढील 3 महिन्यांसाठीचीच आहे. यानंतर या लसींची मुदत संपेल आणि त्या एक्स्पायरी डेट होऊन खराब होतील.” हाँगकाँगमधील फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) लसीचा पहिला डोस एक्स्पायर होण्याच्या मार्गावर आहे. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे माजी कंट्रोलर थॉमस सँग म्हणाले, “सध्या उपलब्ध कोरोना लसी केवळ सप्टेंबरपर्यंतच वापरता येणार आहेत. त्यानंतर या लसींची मुदत संपून त्या वापरता येणार नाही.”
जगात लसींचा तुटवडा आणि यांना असून लसीकरण होईना
थॉमस सँग म्हणाले, “जगात अनेक देशांना कोरोना लसींच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आपण लसी खरेदी करन अशाप्रकारे टाकून द्याव्यात हे चांगलं नाही. आमच्याकडे जितक्या लसी आहेत त्या संपूर्ण एक वर्षासाठी पुरतील इतक्या आहेत. हाँगकाँगने फायजर आणि चीनच्या सिनोवँक कंपनीने 75 लाख डोस खरेदी केल्या. चिनी लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) अनुमती मिळालेली नाही. हाँगकाँगने आधी एस्ट्राझेनेकाच्या 75 लाख डोस बूक केले होते, मात्र नंतर पुन्हा रद्द केल्या.
हेही वाचा :
स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर येऊन घेता येणार लस, मोदी सरकारचा मोठा निर्णय
लसीकरणासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या थेट नदीत उड्या! हे कुठे घडलं?
… तर कोव्हिशील्डच्या तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार? वाचा नवा अभ्यास काय सांगतोय
व्हिडीओ पाहा :
Know all about why Hong Kong going to throw many Corona Vaccines amid shortage