कोहिनूर जडलेला 2.23 किलो सोन्याचा मुकुट, 4500 कोटी रुपये किंमत, जाणून घ्या इंग्लंडच्या नव्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी..

गेल्या 900 वर्षांपासून हा सोहळा वेस्टमिस्टर एब्बे इथे केला जातो. प्रिन्स चार्ल्स हे इंग्लंडचे 40 वे सम्राट असतील. यावेळी कँटरबरीचे आर्च बिशप सेंट एडवर्डस या मुकुटाला चार्ल्स यांच्या डोक्यावर ठेवतील. हा मुकुट सोन्याचा आहे. याचे वजन 2.23 किलो इतके असून याची किंमत सध्या 4500 कोटी रुपये इतकी सांगितली जाते.

कोहिनूर जडलेला 2.23 किलो सोन्याचा मुकुट, 4500 कोटी रुपये किंमत, जाणून घ्या इंग्लंडच्या नव्या राजाच्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी..
कोहिनूर असलेला सोन्याचा मुकुटImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 4:56 PM

लंडन – इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र प्निन्स चार्ल्स हे नवे राजे झाले आहेत. आता त्यांना किंग चार्ल्स तृतीय या नावाने ओळखले जाईल. नव्या राजाच्या रुपात त्यांना काय म्हणून संबोधण्यात येईल, हा राजाचा पहिला निर्णय असणार आहे. परंपरेप्रमाणे त्यांच्यासाठी चार नावे आहेत. चार्ल्स, फिलिप, अर्थर किंवा जॉर्ज. या चार नावांपैकी एक नाव ते स्वतासाठी निवडू शकतात. त्यांची पत्नी कॅथरीन यांना डचेस ऑफ कॉर्नवाल या नावाने ओळखण्यात येईल.

सेरेमोनियल बॉडीकडून लंडनमध्ये होणार अधिकृत घोषणा

महाराणींच्या निधनानंतर 24 तासांच्या आत लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये एका सेरोमोनियल बॉडीच्या मिटिंगमध्ये प्रिन्स चार्ल्स यांची अधिकृत राजेपदी घोषणा करण्यात येईल. या कौन्सिलमध्ये वरिष्ठ खासदार, वरिष्ठ सिव्हिल सर्व्हंट, कॉमनवेल्थ हाय कमीश्नर आणि लंडनचे लॉर्ड मेयर उपस्थित असतील.

साधारणपणे 700 पेक्षा जास्त जण या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात. मात्र यावेळी ही संख्या एवढी नसेल. अगदी थोड्या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने संख्या कमी असण्याची शक्यता आगहे. 1952 मध्ये जेव्हा एलिझाबेथ द्वितीय या राणी झाल्या होत्या, त्यावेळी 200  जण या कार्यक्रमाचे साक्षीदार होते.

हे सुद्धा वाचा

मोठ्या आवाजात राणी आणि राजाचे गुणगान

या कार्यक्रमात सुरवातीला प्रिवी काऊन्सिलचे लॉर्ड प्रेसिडेंट पेनी मोर्डंट महाराणीच्या निधनाची घोषणा करतील. त्यानंतर अनेक प्रार्थना होतील. महाराणीचे गुणगान वर्णन करण्यात येईल. त्याचबरोबर नव्या राजाचेही कौतुक करण्यात येईल. या घोषणापत्रावर पंतप्रधान, आर्क बिशप यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि नेतेमंडळी सह्या करतील. या कार्यक्रमात नव्या राजाने सत्ता सांभाळल्यानंतर काय बदल करण्यात येईल ते ठरवण्यात येईल.

1952 नंतर पहिल्यांदा ‘गॉड सेव्ह द किंग’ हे राष्ट्रगीत गायले जाईल

साधारणपणे एका दिवसानंतर असेशन कौन्सिलची पुन्हा एक बैठक पार पडले. त्यात राजा सामील होतो. या कार्यक्रमात शाही शपथग्रहण कार्यक्रम होत नाही. 18 व्या शतकापासून सुरु असलेल्या परंपरेनुसार राजा चर्च ऑफ स्कॉटलंडला सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतो. यानंतर सेंट पेम्स पॅलेसच्या बाल्कनीतून प्रिन्स चार्ल्स तृतीय हे नवे राजा झाले याची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर इंग्लंडचे राष्ट्रगीत होईल.

1952 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचे राष्ट्रगीत ‘गॉड सेव्ह द किंग’ असे असेल. यापूर्वी ते ‘गॉड सेव्ह द क्वीन’ असे होते. यानंतर नव्या राजाला तोफांची सलामी देण्यात येईल.

राजा झाल्यानंतरही मुकुटासाठी वाट पाहावी लागणार

राज्याभिषेक सोहळ्यासाठी किंग चार्ल्स यांना वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कारण यासाठी मोठी तयारी करण्यात येईल. यापूर्वी क्वीन एलिझाबेथ यांना राज्याभिषेकासाठी 16 महिने वाट पाहावी लागली होती. 1952 साली त्यांच्या पित्याचे निधन झाले आणि जून 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला होता. या राज्याभिषेक सोहळ्याचा खर्च इंग्लंडमधील सरकार करते.

2.23 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट घालण्यात येईल

गेल्या 900 वर्षांपासून हा सोहळा वेस्टमिस्टर एब्बे इथे केला जातो. प्रिन्स चार्ल्स हे इंग्लंडचे 40 वे सम्राट असतील. यावेळी कँटरबरीचे आर्च बिशप सेंट एडवर्डस या मुकुटाला चार्ल्स यांच्या डोक्यावर ठेवतील. हा मुकुट सोन्याचा आहे. याचे वजन 2.23 किलो इतके असून याची किंमत सध्या 4500 कोटी रुपये इतकी सांगितली जाते. हा राज्याभिषेक या सोहळ्याचा केंद्रबिंदू असेल.

या सोन्याच्या मुकुटात कोहिनूरही

विशेष म्हणजे या सोन्याच्या मुकुटात 2900 मौल्यवान हिरे, धातू यांचा समावेश आहे. याच मुकुटात भारताचा कोहिनूर हिराही जोडला गेलेला आहे. 1849 साली झालेल्या युद्धात इस्ट इंडिया कंपनीने शिख साम्राज्यासोबत कोहिनूर हिऱ्यावरही कब्जा मिळवला होता. त्यानंतर लॉर्ड लडहौसीने कोहिनूर बिर्टिनच्या माहाराणी व्हिक्टोरिया यांना पाठवला होता.  या मुकुटाच्या व्यतिरिक्त असलेल्या मौल्यवान खड्यांची एकूण किंमत केली तर ती 31 हजार कोटी इतकी मोठी आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.