इतकी हिम्मत, ‘या’ आखाती देशांचा थेट अमेरिकेला नकार, सरळ सांगितलं मिलिट्री बेस नाही वापरु देणार
अमेरिकेला नकार देणारे हे दोन्ही आखाती देश त्यांचे जवळचे सहकारी आहेत. सुरक्षेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात हे देश अमेरिकेवर अवलंबून आहेत. आता त्यांनी थेट अमेरिकेला नकार दिला आहे. आखातमध्ये मोठा तणाव आहे. युद्धाचे ढग आहेत. अमेरिका हा नकार पचवणार का? की, त्यांना उत्तर देणार लवकरच कळेल.
इराण काही तासात इस्रायलवर हल्ला करु शकतो, असा अमेरिकेने दावा केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं इस्रायलला पूर्ण समर्थन आहे. या दरम्यान कुवेत आणि कतारने अमेरिकेला इशारा दिला आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे विश्वासू सहकारी आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये तणाव आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास इराण विरोधात आम्ही आमच्या देशातील सैन्य तळाचा तुम्हाला वापर करु देणार नाही असं कुवेत आणि कतारने सांगितलय. आखाती देशात अल उदीद येथे अमेरिकेचा मोठा सैन्य तळ आहे.
इराण विरोधात अमेरिकेच्या फायटर जेट्सना आपल्या हवाई हद्दीचा वापर करता येऊ नये, यासाठी कतार आणि कुवेतकडून पावल उचलली जात आहेत. बायडेन प्रशासनासाठी हे आव्हान म्हणून याकडे पाहिलं जातय. अमेरिकेला इराणच्या जवळ असलेल्या सैन्य तळांवरुन अत्यंत अचूक आणि प्रभावी हल्ला करता येऊ शकतो. पण आखाती देशांची ही भूमिका अमेरिकेसाठी अडचणीची ठरत आहे.
इराणमध्ये ती हिम्मत नाही
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये इस्रायलने इराणी दूतावासावर हवाई हल्ला केला होता. या घटनेनंतर इराणने इस्रायलला धडा शिकवणार असल्याच जाहीर केलं आहे. इराण इस्रायलच्या दूतावासाला लक्ष्य करु शकतो, अशी अमेरिकेची शक्यता आहे. इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्यासंदर्भात सिग्नल वाजवले जात आहे. इराण इस्रायल विरोधात थेट आर-पारची लढाई लढेल ही शक्यता कमी दिसतेय. कारण त्यामुळे इराणचही मोठ नुकसान होईल. त्यांना देशांतर्गत अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो.
तिथे अमेरिकेचे किती हजार सैनिक तैनात?
अमेरिकेचा आखाती देशांमध्ये मोठा सैन्य तळ आहे. या क्षेत्रात अमेरिकेचे कमीत कमी 40 हजार सैनिक तैनात आहेत. अमेरिकेच्या प्रमुख ठिकाणांमध्ये कतारमधील अल उदीद एअर बेस आहे. यूएस सेंट्रल कमांडच क्षेत्रीय मुख्यालय आहे. अल उदीद बेसवर इस्रायली सैन्याचे अधिकारी आले होते, अशी माहिती आहे. पण इस्रायलने अजून अधिकृत दुजोरा दिलेला नाही.