North Koria: उत्तर कोरियात 11 दिवस हसण्यालाही बंदी, किम जोंग उनने जाहीर केला राष्ट्रीय शोक
विशेष म्हणजे या 11 दिवसाच्या कालावधीत कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच नातेवाईक मृतदेहावर अंत्यसंस्कारही 11 दिवसाचा शोक पूर्ण झाल्यानंतर करु शकतात, अशी माहिती एका नागरिकाने दिली.
उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचे माजी नेता किम जोंग इल यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरिया 11 राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे विद्यमान नेता किम जोंग उन यांनी हा शोक जाहीर केला आहे. या 11 दिवसात उत्तर कोरियातील नागरिकांना हसणे, शॉपिंग करणे, दारु पिणे, वाढदिवस साजरा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारही करता येणार नाहीत
विशेष म्हणजे या 11 दिवसाच्या कालावधीत कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच नातेवाईक मृतदेहावर अंत्यसंस्कारही 11 दिवसाचा शोक पूर्ण झाल्यानंतर करु शकतात, अशी माहिती एका नागरिकाने दिली. पोलिस अधिकाऱ्यांना लोकांवर सतत लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
किम जोंग इल यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय शोक
उत्तर कोरियाचे माजी नेता किम जोंग इल यांची शुक्रवारी दहावी पुण्यतिथी आहे. किम जोंग इल यांनी 1994 ते 2011 पर्यंत उत्तर कोरियावर राज्य केले. 17 डिसेंबर 2011 मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. याला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळेच उत्तर कोरियाचे विद्यमान किम जोंग यांनी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या 11 दिवसात नागिरक हसून किंवा दारु पिऊन आपला व्यक्त करु शकत नाही.
दरवर्षी पाळला जातो शोक
सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जे लोक शोक कालावधी दरम्यान मद्यप्राशन करताना किंवा आनंद साजरा करताना आढळले आहेत, त्यांना वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करून शिक्षा करण्यात आली आहे. अधिकारी त्यांना घेऊन गेले आणि ते पुन्हा कधीही दिसले नाहीत. उत्तर कोरियामध्ये हा शोक दरवर्षी 10 दिवसांचा असतो. मात्र यावेळी किम जोंग इल यांच्या निधनाला 10 वर्षे पूर्ण झाल्याने यंदा 11 दिवस शोक जाहीर करण्यात आला आहे. (Laughter banned for 11 days in North Korea, Kim Jong Un declared national mourning)
इतर बातम्या
तब्बल 41 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे बलात्काराचा खटला; केस बंद करण्याची पीडितेची मागणी