Israel vs Hezbollah : अजून बरच काही घडणार, इस्रायलने काल ट्रेलर दखवला, आता हिजबुल्लाहला मोठी वॉर्निंग

Israel vs Hezbollah : इस्रायलने हिजबुल्लाहला थेट मोठी धमकी दिली आहे. काल हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहने इस्रायलला पलटवार करण्याची धमकी दिली. त्यानंतर काही मिनिटात इस्रायलने दक्षिण लेबनानमध्ये एअर स्ट्राइक केला. यापुढे हिजबुल्लाहच्या बाबतीत इस्रायल जराही मागे-पुढे पाहणार नाही हे स्पष्ट झालय.

Israel vs Hezbollah : अजून बरच काही घडणार, इस्रायलने काल ट्रेलर दखवला, आता हिजबुल्लाहला मोठी वॉर्निंग
Israel vs Hezbollah
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 9:29 AM

इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी हिजबुल्लाहला थेट वॉर्निंग दिली आहे. हिजबुल्लाहला मोठी किंमत चुकवावी लागेल, असं योआव गॅलेंट यांनी म्हटलं आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर गॅलेंट यांनी हे वक्तव्य केलय. इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये प्रचंड तणाव आहे. लेबनानमध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले झाले, त्या विरोधात हिजबुल्लाह नेता हसन नसरल्लाने इस्रायलवर पलटवार करण्याचा संकल्प केला आहे. उत्तर इस्रायलमध्ये नागरिकांना पुन्हा वसवणं हा इस्रायलचा उद्देश असल्याच गॅलेंट यांनी स्पष्ट केलं. वेळेनुसार, हिजबुल्लाहला मोठी किंमत चुकवावी लागेल. आमची सैन्य कारवाई सुरुच राहील असं गॅलेंट यांनी सांगितलं. हिजबुल्लाहने अलीकडे लेबनानमधून उत्तर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले. त्यामध्ये इस्रायली नागरिकांच मोठ नुकसान झालं. त्यांना राहती घर सोडावी लागली. त्यामुळे आता इस्रायलयने हिजबुल्लाह विरोधात कठोर भूमिका घेतली आहे.

मागच्या दोन दिवसात लेबनानमध्ये हिजबुल्लाहचे दहशतवादी पेजर, वॉकी-टॉकी स्फोटात मारले गेले. यामागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद असल्याच म्हटलं जातं. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी युद्धाचा नवीन टप्पा सुरु झाल्याची घोषणा केली आहे. लेबनानमध्ये मंगळवारी पेजर आणि बुधवारी वॉकी-टॉकीमध्ये स्फोट झाले. यात 30 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. शेकडो लोक जखमी झाले. लेबनानच्या रस्त्यावर भिती, दहशत, गोंधळाच वातावरण आहे. सतत रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज ऐकू येत आहेत.

दृढ निश्चय, जिद्द हवी

लेबनानमध्ये बुधवारी वॉकी-टॉकी आणि अन्य उपकरणात स्फोट झाले. यात जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. 450 लोक जखमी झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट बुधवारी सैनिकांना उद्देशून म्हणाले की, “आम्ही युद्धाच्या नवीन टप्प्याची सुरुवात करत आहोत. यात साहस, दृढ निश्चय आणि जिद्द आवश्यक आहे”

600 पेक्षा जास्त लोक जखमी

पेजर हल्ल्याला आम्ही अत्यंत कठोर, सडेतोड उत्तर देऊ असं हिजबुल्लाहच्या कार्यकारी परिषदेच्या प्रमुखाने शब्द दिला आहे. बेरुत येथे लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की, “दुसऱ्या दिवशी झालेल्या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला. 600 पेक्षा जास्त लोक जखमी झाले”

पेजर की, वॉकी-टॉकी जास्त तीव्रता कुठल्या स्फोटाची?

या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार ठरवण्यात येत आहे. “बुधवारच्या हल्ल्यात गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण वॉकी-टॉकीमध्ये झालेला स्फोट जास्त क्षमतेचा होता. पेजर स्फोटाच्या तुलनेत वॉकी-टॉकी स्फोटाची तीव्रता अधिक होती” असं फिरास अबैद म्हणाले. बुधवारी 608 लोक जखमी झाले असं अबैद यांनी सांगितलं. 141 जणांची सर्जरी करण्यात आली.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....