इटली-स्पेनमध्ये लॉकडाऊन, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशात काय खबरदारी?
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेन यांनी आज सकाळी लॉकडाऊनची घोषणा केली (lockdown in Italy and spain). याशिवाय इटलीतही दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे (lockdown in Italy and spain). हा आजार प्रचंड वेगाने पसरत आहे. या आजारावर विशेष असं औषध निर्माण झालेलं नाही. त्यामुळे कोरोना फोफावत चालला आहे. या आजाराने इटलीत 825 पेक्षा जास्त तर स्पेनमध्ये 190 पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय हजारो नागरिक कोरोनाने बाधित आहेत. अखेर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली (lockdown in Italy and spain).
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेन यांनी आज सकाळी लॉकडाऊनची घोषणा केली. स्पेनमध्ये 6300 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 191 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अखेर लॉकडाऊनची घोषणा स्पेनच्या पंतप्रधानांना करावी लागली.
याशिवाय इटलीतही दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. इटलीत 12000 पेक्षा जास्त लोक कोरोनाने बाधित आहेत. तर 825 पेक्षाही जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतातही कोराना फोफावला, केंद्र सरकारकडून खबरदारी
इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना पसरत चालला आहे. आतापर्यंत भारतात 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : कोरोना म्हणजे पाप नाही, बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार : पुणे विभागीय आयुक्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशातून आता खबरदारी घेतली जात आहे. भारताने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. भारताने विदेशातून येणाऱ्या सर्व लोकांचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द केला आहे. याशिवाय भारताने सीमा सील केलं आहे. याशिवाय विदेशात राहणाऱ्या भारतीयांना केंद्र सरकारने भारत दौरा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेचेही कठोर पाऊल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहेत. अमेरिकेने देशात आणीबाणी घोषित केली आहे. अमेरिकेने ब्रिटन वगळता इतर युरोपीय देशांसाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. शिवाय ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी फक्त मोजक्याच विमानतळांवर उतरण्याची परवानगी दिली आहे.
सौदी अरेबियाचेही निर्बंध
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया देशाने आपल्या सर्व नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केलं आहे. याशिवाय अनेक देशांमध्ये जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द केले आहे.
कतारचे 14 देशांवर बंदी
कतारनेदेखील कठीण पाऊले उचलली आहेत. कतारने भारत, फिलीपींस, पाकिस्तान, दक्षिण कोरियासह 10 देशांवर निर्बंध घातले आहेत. या देशांना कतारमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा नागरिकांना सल्ला
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सर्व नागरिकांना विदेशी यात्रा टाळण्याचा सल्ला दिला आहे.
दक्षिण कोरियाची 90 टक्के विमान सेवा ठप्प
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने आपली विमानसेवा बंद केली आहे. या देशात एकही विदेशी विमान सध्या जात नाही, फक्त देशातल्या देशात विमान सेवा सुरु आहे. मात्र, त्याचंही प्रमाण कमी आहे.
जगभरात 129 देशांमध्ये कोरोना
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात 129 देशात कोरोना पसरला आहे. जवळपास दीड लाखापेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावरही गंभीर परिणाम होत आहे. यावर सर्वच देश योग्य उपाययोजन करत असून परिस्थितीशी झुंजत आहेत.
संबंधित बातम्या :
‘आयसिस’लाही कोरोनाची धास्ती, युरोप दहशतवाद्यांच्या टार्गेटवरुन दूर
Corona | कोल्हापुरात पोल्ट्री व्यावसायिकाकडून साडेतीन लाख कोंबडीची पिल्लं, 2 लाख अंडी नष्ट
Corona | कोरोनाची भीती! मुंबईतील आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
Corona | महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण, देशातील आकडा 100 च्या पार, पाक सीमा सील