Lata Mangeshkar: लता मंगेशकर एकमेवाद्वितीय, त्यांचा आवाज अमर राहील; लतादीदींच्या निधनाने पाकिस्तानही हळहळला
आपल्या स्वरांनी देशावासियांनाच नव्हे तर सातासमुद्रापलिकडील रसिकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा, युगाचा अस्त झाला.
इस्लामाबाद: आपल्या स्वरांनी देशावासियांनाच नव्हे तर सातासमुद्रापलिकडील रसिकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा, युगाचा अस्त झाला. लतादीदींच्या निधनाने केवळ भारतीयांनाच (india) दु:ख झालेले नाही तर शेजारील देश असलेला पाकिस्तानही (pakistan) हळहळला आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांपासून ते पाकिस्तानी नागरिकांनी ट्विटरवर लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लतादीदी केवळ भारताच्याच नव्हत्या तर त्या आमच्याही होत्या. लतादीदी एकमेवाद्वितीय आहेत. त्यांचा आवाज सदैव अमर राहील, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. एका यूजर्सने तर लतादीदी पुन्हा नुरजहाँना भेटायला गेल्या आहेत, असं भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर, दुसऱ्या एका यूजर्सने लतादीदींची हजारो गाणी आहेत. त्यापैकी पाच अप्रतिम गाणी निवडायची झाली तर ती गाणी निवडणं कठिण आहे. त्यांची सर्वच गाणी अविट गोडीची आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट करून लतादीदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक महान व्यक्ती राहिली नाही. लता मंगेशकर या सूरांची राणी होत्या. त्यांनी अनेक दशके संगीत जगतावर अधिराज्य गाजवलं. संगीत जगतात त्यांच्यासारखा कोणीच नव्हता. त्यांचा आवाज येणाऱ्या काळातही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहील, अशा शब्दात फवाद चौधरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाकिस्तानात #RIPLataMangeshker हा हॅशटॅगही सुरू झाला आहे.
A legend is no more, #LataMangeshkar was a melodious queen who ruled the world of music for decades she was uncrowned queen of music her voice shall keep ruling the Hearts of people for all times to come #RIPLataMangeshker
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) February 6, 2022
आमच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व
लतादीदींचा एक पाकिस्तानी फॅन्स शकील अहमद यांनेही ट्विट करून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. लिजेंड लतादीदींचं निधन झाल्याचं ऐकून दु:ख झालं. ईश्वर त्यांना पुढच्या दुनियेत शांती देवो. शांतीची आशा. लव्ह इंडिया…, असं शकील अहमद म्हणाले होते. पाकिस्तानी पत्रकार आमिर रजा खान यांनी लतादीदींचे लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. हार्टब्रेकिंग… ही छोटी मुलगी संगीताच्या दुनियेची राणी बनेल हे कुणाला माहीत होतं. लताजी, तुम्ही आमच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व आहात. तुम्ही भारत, पाकिस्तान आणि संपूर्ण जगातील संगीता प्रेमींच्या राणी आहात, असं आमिर रजा खान यांनी म्हटलं आहे.
#LataMangeshkar Heartbreaking Who knew that this little girl become a queen of melody Lata ji you are a real legend of our time . RIP you are queen of all music lovers in India , Pakistan even rest of the world pic.twitter.com/8Q8ax5TCZk
— Amir Raza Khan (@AmirRazakhan042) February 6, 2022
नूर जहाँना पुन्हा भेटल्या
पाकिस्तानच्या कामरान रहमत यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. मधूर आवाज शांत झाला. लताजी पुन्हा नूर जहाँना भेटायला गेल्या आहेत, असं कामरान म्हणतात. लता मंगेशकर या भारतीय उपखंडातील सर्वात लोकप्रिय आणि महान संगीतकार होत्या. त्या कायम आमच्या हृदयात जिवंत राहतील, असं एका फॅन्सने लिहिलं आहे. तर रिजवान वसीर यांनी जादूई आवाजाच्या युगाचा अंत झाला आहे. लतादीदी तुम्ही आमच्या हृदयात आहात. पाकिस्तानकडून तुम्हाला प्रेम, असं म्हटलं आहे.
THE MELODY FALLS SILENT Lata reunites with Noor Jehan https://t.co/kr12i3RtUg#LataMangeshkar #NoorJehan #India #Pakistan pic.twitter.com/m7AVFdH9FX
— Kamran Rehmat (@kaamyabi) February 6, 2022
संबंधित बातम्या:
Lata Mangeshkar : मुंबईतील या मार्गाने निघणार लतादिदींची अंत्ययात्रा, पंतप्रधान मोदी मुंबईत येणार
Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा
Lata Mangeshkar: लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर