Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेने महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. (Majority of US House votes to impeach US President Donald Trump)

Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 4:31 AM

वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेने महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई करता यावी म्हणून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) मतदान झालं.’एनबीसी न्यूज’च्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने डेमोक्रॅटच्या 222 तर रिपब्लिकन पक्षाच्या 10 खासदारांनी मतदान केलं. अमेरिकेन घटनेनुसार महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज असून त्यापेक्षा जास्त मते पडली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. महाभियोग प्रस्ताव मंजूर झाल्याने ट्रम्प हे दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करणारे पहिलेच अमेरिकन राष्ट्रपती ठरले आहेत.(Majority of US House votes to impeach US President Donald Trump)

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या समर्थकांना चिथावणी देण्याचा आरोप आहे. त्यांनी चिथावल्यामुळेच अमेरिकेच्या संसद परिसरात त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. त्यामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे अमेरिकेची संपूर्ण जगात नाचक्की झाली होती. तसेच ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात येत आहे.

भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 3.30 वाजता अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात महाभियोगावर मतदान घेण्यात आलं. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने डेमोक्रॅटच्या 222 तर रिपब्लिकन पक्षाच्या 10 खासदारांनी मतदान केलं आहे. अमेरिकन घटनेनुसार महाभियोग चालवण्यासाठी 218 मतांची गरज असून त्यापेक्षा जास्त मते पडली आहेत. म्हणजे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने एकूण 232 तर महाभियोगाच्या विरोधात 197 मते पडली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव सीनेटमध्ये जाणार असून तिथे त्याला मंजुरी मिळताच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

ट्रम्प अमेरिकेसाठी धोकादायक

कनिष्ठ सभागृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अमेरिकन संसदेचे अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनीही या चर्चेत भाग घेतला. अमेरिकेच्या मावळत्या राष्ट्रपतीने आपल्या देशाच्याविरोधात त्यांच्या समर्थकांना चिथावलं. त्यामुळे सशस्त्र बंड झालं. म्हणूनच त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. ज्या राष्ट्रावर सर्वजण प्रेम करतात, त्या राष्ट्रासाठी ट्रम्प धोकादायक ठरले आहेत, असं पेलोसी म्हणाल्या.

”मी तुमच्यासमोर आपल्या संविधानाची एक रक्षणकर्ती, एक पत्नी, एक आई, एक आजी आणि एक मुलगी म्हणून उभी आहे. माझ्या वडिलांनी या सभागृहाची सेवा केली आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. माझ्या अमेरिकन बांधवांनो, आपण इतिहासापासून पळून जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपलं कर्तव्य बजावूया आणि या राष्ट्राने आपल्यावर जो विश्वास दाखवला, त्याचा आदर राखूया,” असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.

ट्रम्पच्या जाळ्यातून बाहेर पडा

ट्रम्प यांनी त्यांच्यावर महाभियोगानुसार कारवाई व्हावी असंच काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई केली पाहिजे. अमेरिकेने आता ट्रम्प यांच्या जाळ्यातून बाहेर पडलं पाहिजे, असं सीनेट नेते मॅककोनेल यांनी म्हटलं आहे. तसं वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिलं आहे.

काय घडलं ‘त्या’ दिवशी?

ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून जो बायडेन नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. परंतु, ट्रम्प आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. बायडेन यांनी निवडणुकीत घोळ घालून विजय मिळविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पराभव मान्य नसल्यामुळेच ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना वारंवार चिथावले होते. 6 जानेवारी रोजी जो बायडेन यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. म्हणजे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून या सोहळ्यापूर्वीच ट्रम्प समर्थकांनी संसद परिसरात घुसून धुडगूस घातला. काही आंदोलकांनी संसदेच्या उपाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी 57 आंदोलकांना अटक केली असून आंदोलकांकडून बंदुका जप्त करण्यात आल्या होत्या. (Majority of US House votes to impeach US President Donald Trump)

संबंधित बातम्या:

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?

जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..

डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी

(Majority of US House votes to impeach US President Donald Trump)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.