Malala Yousafzai Video : हसन मिनाझला अनफॉलो करावं का? दाढी काढली तर..? पती असरसोबत मलालाचा नववर्षाचा अनोखा खेळ

नोबेल पुरस्कार (Nobel Prize) विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) आणि तिचा पती असर मलिक (Asser Malik) एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नवीन वर्षाचा संकल्प करण्याच्या दृष्टीनं गेम खेळताना दिसत आहेत.

Malala Yousafzai Video : हसन मिनाझला अनफॉलो करावं का? दाढी काढली तर..? पती असरसोबत मलालाचा नववर्षाचा अनोखा खेळ
मलाला युसुफझाई आणि असर मलिक
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 3:57 PM

इस्लामाबाद : नोबेल पुरस्कार (Nobel Prize) विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) आणि तिचा पती असर मलिक (Asser Malik) एक व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही नवीन वर्षाचा संकल्प करण्याच्या दृष्टीनं गेम खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मलाला आणि तिचा पती असर मलिक टेबलच्या वर काही अंतरावर ठेवलेल्या ग्लासमध्ये पेन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कोणता निश्चय कारायचा आणि कोणता नाही, हे ठरवलंय.

दोघांचाही चुकतो अंदाज व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 1 मिनिट 22 सेकंदाचा आहे. व्हिडिओमध्ये मलाला तिच्या पतीला विचारते, की मी येत्या वर्षभरात जिममध्ये जावं का? नंतर ती पेन ग्लासमध्ये टाकण्यासाठी फेकते. तिचा अंदाज चुकतो. यानंतर तिचा नवरा असर प्ले स्टेशन विकत घेऊ का असे विचारतो आणि पेन ग्लासच्या दिशेनं फेकतो, पण त्याचाही अंदाज चुकतो.

दाढी काढण्याची परवानगी नाही मलाला पुन्हा विचारते, की असरनं दाढी काढावी का? त्याला ती स्वतःच उत्तर देते आणि म्हणते की नाही, तुला हे करण्याची परवानगी नाही. असं केल्यास घर सोडावं लागेल. यानंतर असरनं मलालाला ‘नो शॉपिंग जानेवारी’ साजरा करायचा का, असा सवाल केला. त्यानंतर तो पेन फेकतो, मात्र ग्लासवर आदळल्यानंतर तो खाली पडतो. यावर मलाला म्हणते, की तो खूपच जवळ होता.

व्हिडिओच्या शेवटी देणगीची मागणी यानंतर मलालानं पुढचा प्रश्न विचारला, की मी हसन मिनाजला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करावं का? हसन मिनाज हा अमेरिकन कॉमेडियन आहे. मात्र, यावेळीही तिचा पेन ग्लासवर आदळला आणि खाली पडला. मलाला म्हणते, की मला वाटतं की आपण ते होय म्हणून पाहिलं पाहिजे. कारण तो ग्लासला स्पर्श करतोय. यानंतर असरनं हसन मिनाजला फॉलो करू का असं विचारलं, पण त्याचा पेनही ग्लासच्या खूप पुढे पडला. व्हिडिओच्या शेवटी मलाला ‘हसन मिनाजसह जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मलाला फंडात दान करावं’, असं म्हणताना ऐकू येतं. यावेळी ती स्वतः उठते आणि पेन जवळच्या ग्लासात टाकते.

अमित शहा म्हणाले, आघाडी सरकार महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देणार काय?; सुभाष देसाई म्हणतात, आमचे उद्योग पळवणं आधी बंद करा

Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं ‘हे’ व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?

Foldable Mobile : Xiaomi Fold 2मध्ये वापरला जाणार Samsungचा डिस्प्ले; वाचा, आणखी काय फिचर्स आहेत

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.