भारताशी पंगा घेऊन फसला मालदीव, या देशापुढे हात पसरवण्याची आली वेळ

मालदीव चीनच्या कर्जात चांगलाच बुडाला असून जागतिक बँकेच्या मते, मालदीववर चीनचे कर्ज १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे, जे मालदीवच्या एकूण कर्जाच्या २० टक्के आहे. आता मालदीवने चीनसोबत आणखी एक करार केला आहे. ज्यामुळे त्यांना भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

भारताशी पंगा घेऊन फसला मालदीव, या देशापुढे हात पसरवण्याची आली वेळ
Follow us
| Updated on: Sep 14, 2024 | 1:43 AM

चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या मालदीवने पुन्हा एकदा चीनसोबत करार केला आहे. यामध्ये चीनकडून मालदीवला आणखी आर्थिक मदत दिली जाणार आहे. पीपल्स बँक ऑफ चायना आणि मालदीवचे आर्थिक विकास मंत्रालय यांच्यातील करार झालाय. त्यामुळे चीनला मालदीवमध्ये थेट गुंतवणूक करता येणार आहे. या करारामुळे व्यापार आणि गुंतवणूक मजबूत होण्यास मदत होईल, असे चीनच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. चीनने मात्र या कराराबद्दल इतर काहीही खुलासा केलेला नाही. मुइज्जू हे चीन समर्थक असल्याने भारत विरोधी भूमिका घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले होते.

मालदीव सध्या प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. चीनचं मालदीववर सर्वाधिक कर्ज आहे. चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू सत्तेत आल्यापासून ते सतत चीनच्या दबावाखाली मालदीवची अर्थव्यवस्था संकटात आणत आहेत. आधीच देश डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर उभा आहे. नवीन करारानंतर एका निवेदनात, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ते मालदीवच्या वाढत्या कर्जाबद्दल आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्याबद्दल बोलत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, ‘चीन नेहमीप्रमाणेच मालदीवच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आपल्या क्षमतेनुसार मदत आणि सहकार्य करेल.’

मालदीवचे कर्ज संकट वाढले

मालदीवचे कर्ज संकट सातत्याने वाढत आहे. काही महिन्यांत चिंता इतकी वाढली आहे की रोखीने अडचणीत असलेला मालदीव इस्लामिक सार्वभौम कर्ज चुकवणारा पहिला देश बनू शकतो. मालदीव सरकारने गुरुवारी पुढील महिन्यात $25 दशलक्ष देण्यास अपयशी ठरणार नाही असे वचन दिले आहे. जागतिक बँकेच्या मते, मालदीवला सर्वाधिक कर्ज चीनने दिले आहे. मालदीववर बीजिंगचे कर्ज 1.3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे. अधिक मदत देण्यासाठी चीन मालदीवशी चर्चा करत आहे. दरम्यान, चीनचे कोणतेही कर्ज मालदीववरील बीजिंगच्या कर्जाच्या सापळ्याला आणखी मजबूत करेल.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.