India-Maldives : मालदीवचे नेते भारताच कौतुक करुन थकत नाहीयत, आता परराष्ट्र मंत्री म्हणतात….

India-Maldives : भारत आणि मालदीवमधले बिघडलेले संबंध आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. भारतीयांनी मालदीवला माफ करावं, म्हणून त्या देशाकडून बरेच प्रयत्न सुरु आहेत. मालदीवची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे. भारताच्या नाराजीचा मोठा फटका त्यांनी सहन केलाय.

India-Maldives : मालदीवचे नेते भारताच कौतुक करुन थकत नाहीयत, आता परराष्ट्र मंत्री म्हणतात....
India-Maldives Relation
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 1:14 PM

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताने मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं होतं. परराष्ट्र मंत्री मूसा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “भारत एक मोठा लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. आमच्यासह अन्य राष्ट्रांसाठी भारत एक प्रेरणास्थान आहे” सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मालदीव आणि भारतामधील संबंधांबद्दल सुद्धा बोलले. दोन्ही देशांच्या सक्रीय सहकार्याने संबंध मजबूत झाले आहेत. हे संबंध भक्कम ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याच सुद्धा त्यांनी सांगितलं.

मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात चीन समर्थक मुइज्जू यांनी शपथ घेतल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले. हे संबंध सुधारण्यासाठी मागच्या काही दिवसांपासूव अनेक स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाली. या महिन्याच्या सुरुवातीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीवच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रपती मुइज्जूसह मालदीवच्या नेतृत्वाची भेट घेतली. याआधी जून महिन्यात मुइज्जू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी दिल्लीत आले होते. “मालदीव आणि भारतामध्ये दीर्घ काळापासून सुरु असलेल्या सहकार्यावर मी विचार केला. आमचे संबंध द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून पुन्हा मजबूत झाले आहेत” असं मूसा म्हणाले.

भारतीय राजदूताने काय उत्तर दिलं?

मूसा यांनी एक्सवर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आभार मानले. ‘स्वातंत्र्य दिनासाठी भारतात बोलवल्याबद्दल भारतीय राजदूत मनु महावर यांचे आभार मानले’ त्यावर महावर यांनी उत्तर दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वात आमचं मैत्रीच नातं अजून भक्कम होईल” असं महावर यांनी पोस्टमध्ये म्हटलय.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.