Boycott Maldives | भारताबरोबर प्रचंड तणाव असताना चीनमध्ये जाऊन मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू काय म्हणाले?
Boycott Maldives | सध्या भारत आणि मालदीवमध्ये मोठा वाद सुरु आहे. देशात ही स्थिती असताना, मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू चीन दौऱ्यावर गेले आहेत. खरतर या सगळ्या वादाच मूळ मोहम्मद मोइज्जू यांच्या भूमिकेत आहे. कारण चीन हा त्यांचा आवडता देश आहे.
Boycott Maldives | भारताबरोबर मोठा वाद सुरु असताना मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू चीन दौऱ्यावर गेले आहेत. खरतर या सगळ्या वादाच मूळ मोहम्मद मोइज्जू यांच्या भूमिकेत आहे. कारण मोहम्मद मोइज्जू यांचा सगळा कल चीनकडे आहे. मालदीवमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक भारतविरोधाच्या आधारावर लढवली होती. त्यामुळे सत्तेत येताच मोहम्मद मोइज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेली अपमानस्पद टिप्पणी त्याच विरोधाचा भाग आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आपण किती मोठी चूक केलीय हे मालदीवच्या लक्षात आलं. सध्या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला असताना मोहम्मद मोइज्जू चीन दौऱ्यावर गेले आहेत.
त्यांचा चीनचा हा पहिला राजकीय दौरा आहे. मोहम्मद मोइज्जू यांचा हा चीन दौरा पाच दिवसांचा आहे. सोमवारी पहिल्यादिवशी त्यांनी फुजियाना प्रांताच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारत आणि मालदीवमध्ये तणाव असताना मोहम्मद मोइज्जू चीनमध्ये आहेत. मोइज्जू यांच्या दौऱ्याबद्दल चीनने अजून कुठलही अधिकृत स्टेटमेंट केलेलं नाही. मोइज्जू चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करतील, असं चीनकडून आधी सांगण्यात आलं होतं. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होतील.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काय म्हणाले?
बीजिंगमध्ये दाखल झाल्यानंतर मोहम्मद मोइज्जू यांनी चीनला आपल विश्वासू सहकारी म्हटलं. दोन्ही देशातील संबंधांच त्यांनी कौतुक केलं. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांच्यानुसार, मुइज्जू यांची चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांच्याबरोबर अजून भेट व्हायची आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांबद्दल अनेक करार होतील. चीन आणि मालदीवमधील संबंध ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचले आहेत, असं वांग वेनबिन म्हणाले. या दौऱ्याच्या माध्यमातून दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास वांग यांनी व्यक्त केला. मुइज्जू यांनी चीनच्या कम्युनिकेशंस कंस्ट्रक्शन कंपनीच्या (सीसीसीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली व मालदीवच्या विकास यात्रेत चीनला एक महत्त्वाच सहकारी ठरवलं.