मालदीव सरकारला त्यांच्याच लोकांनी फटकारलं, पाहा भारताबाबत काय म्हणाले

India Maldives Relation : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यासाठी सरकारने त्यांच्याच उपमंत्र्यांना निलंबित केले आहे. यावेळी मालदीवमधील लोकांनीच त्यांच्या सरकारवर टीका केली आहे. मालदीवच्या दोन माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी उपराष्ट्राध्यक्षांनी भारताबाबत ही वक्तव्य केले आहे.

मालदीव सरकारला त्यांच्याच लोकांनी फटकारलं, पाहा भारताबाबत काय म्हणाले
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 5:07 PM

India Maldives row : भारतीय उच्चायुक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप बाबतच्या पोस्टवर केलेल्या “अपमानजनक” टिप्पण्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मालदीव सरकारने आपल्या तीन उपमंत्री मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान यांना निलंबित केले. भारताच्या बाजुने अनेक जण उभे राहिले आहेत. मालदीव सरकारने या आक्षेपार्ह विधानांपासून स्वतःला दूर केले आहे. मालदीव सरकारने ही वैयक्तिक मते असल्याचे म्हटले आहे. या वादग्रस्त टिप्पण्यांचा मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष, माजी उपराष्ट्राध्यक्ष, माजी परराष्ट्र मंत्री आणि काही उद्योगपतींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलिह यांनी ट्विट केले- ‘मी द्वेषपूर्ण भाषेचा निषेध करतो, भारत मालदीवचा चांगला मित्र आहे’

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी ट्विट केले की, “मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषेचा वापर करण्यात आल्याचा मी निषेध करतो. भारत हा नेहमीच मालदीवचा चांगला मित्र आहे आणि आम्ही अशा कठोर टिप्पण्या खपवून घेणार नाही.’

माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी ट्विट केले की, ‘मालदीवच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख मित्रपक्षाच्या नेत्यासाठी मरियम शिउना यांनी अशी वाईट भाषा वापरली होती. मालदीव सरकारने या टिप्पण्यांपासून दूर राहावे. मालदीव सरकारने भारताला आश्वासन द्यावे की यातून सरकारचे विचार दिसून येत नाहीत.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही मालदीवच्या उपमंत्र्यांच्या अपमानास्पद ट्विटवर संताप व्यक्त केला आहे. यावर मालदीवचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अहमद अदीब म्हणाले, ‘मी मंत्री असताना अनेक बॉलिवूड कलाकारांचे स्वागत केले. ते आमच्यात सामील झाले आणि आम्हाला मालदीव आता जिथे आहे तिथे तयार करण्यात मदत केली. त्यांना आमच्या विरोधात भाष्य करावे लागले अशा परिस्थितीत आम्ही आलो हे अतिशय दुःखद आहे. कोविडनंतर भारतीय पर्यटकांनीच मालदीवच्या पर्यटन उद्योगाला खरोखरच वाचवले आहे.

मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘हा मेसेज सध्याच्या मालदीव सरकारच्या दोन उपमंत्र्यांनी आणि सत्ताधारी आघाडीतील एका राजकीय पक्षाच्या सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर केला आहे. हे विधान निषेधार्ह आणि घृणास्पद आहे. या अधिकाऱ्यांना फटकारण्याची मी सरकारला विनंती करतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.