डिसेंबर महिना सुरू आहे. नाताळ अगदीच दोन दिवसांवर आलाय. यादरम्यान लोक आपला नाताळ खास बनवण्यासाठी विविध उपाय करत आहेत. नुकतंच एक व्यक्ती समोर आलीये, जी नाताळला खास बनवण्यासाठी एक अजब प्रकार करताना दिसलीये. त्याने आपल्या दाढीत एकूण 710 घंटा लटकवून विक्रम तयार केलाय.
खरंतर या व्यक्तीचा एक व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समोर आला आहे. या व्यक्तीने हा पराक्रम कसा केला आहे, हे यातून दिसून येते.
खुद्द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्यक्तीचं नाव जोस स्ट्रासर असून या व्यक्तीनं हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय. या स्टंटनंतर त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीनं एकामागोमाग एक या सगळ्या घंटा आपल्या दाढीत कशा लावल्या, ते दिसतंय. यानंतर त्याने आपल्या संपूर्ण दाढीत एकूण 710 घंटा लटकवल्या. ही एक वेदनादायक आणि दीर्घ प्रक्रिया होती, तरीही त्या माणसाने हा विक्रम तयार करण्यात यश मिळवले.
जेव्हा त्याचा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या अधिकृत पेजवर पोस्ट करण्यात आला, तेव्हा त्यानेही कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत.