VIDEO | इमारती उद्ध्वस्त, शहरं बेचिराख, तरीही युक्रेनवासियांचा संघर्ष कायम, पाहा जिंदादिली दाखवणारा व्हिडीओ
जीवाचं थरकाप उडवणारं दृष्य आणि स्मशान शांतता युक्रेनमध्ये दिसून येतेय. रशियाच्या आक्रमणामुळे एक सुंदर शहर बेचिराग झालंय. इमारतीचे कोसळलेले भाग युद्धाची भीषणता दाखवतात. मोठ मोठ्या इमारती रिकम्या झाल्या आहेत. जीव वाचवण्याच्या आकांतानं नागरिक लपून बसले आहेत. प्रत्येक क्षण मुठीत घेऊन नागरिक जगतायेत. इमारतींना लागलेली आग, धुराचे लोट आणि उद्धवस्त झालेला परिसर पाहुण भविष्याविषयी देखील चिंता लागून आहे.
कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) चाललेल्या युद्धाची भीषणता एका व्हिडीओमधून समोर आली आहे. युक्रेनमधून एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. जीवाचं थरकाप उडवणारं दृष्य आणि स्मशान शांतता युक्रेनमध्ये (Ukraine) दिसून येतेय. रशियाच्या आक्रमणामुळे एक सुंदर शहर बेचिराख झालंय. इमारतीचे कोसळलेले भाग युद्धाची भीषणता दाखवतात. मोठ मोठ्या इमारती रिकम्या झाल्या आहेत. जीव वाचवण्याच्या आकांतानं नागरिक लपून बसले आहेत. प्रत्येक क्षण मुठीत घेऊन नागरिक जगतायेत. इमारतींना लागलेली आग, धुराचे लोट आणि उद्धवस्त झालेला परिसर पाहून भविष्याविषयी देखील चिंता युक्रेनमधील नागरिकांना सतावते आहे. बलाढ्य रशियानं केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील असंख्य इमारती उद्धवस्त झाल्या आहेत. लोक भीतीपोटी इमारीत सोडून सुरक्षितस्थळी गेले आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी सीमा ओलांडली आहे. युद्धाची भीषणता पाहून जीव वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण युक्रेनमध्ये मोठा आणि धोकादायक वाटतो आहे.
युक्रेनमधील भीषणता
युक्रेनच्या रस्त्यांवर क्वचित नागिरक दिसून युक्रेनमधील नव्या व्हिडीओतून दिसत आहे. युद्धात (Russia Ukraine War) सुरु असलेले आक्रमक हल्ले पाहून जीव वाचवण्याची भीती युक्रेनच्या नागरिकांना आहे. युक्रेनच्या रस्त्यांवर चहुकडे गाड्यांचे अवशेष, उद्धवस्त झालेला परिसर दिसून येतोय. त्यामुळे या अर्धवट तुटलेल्या इमारती देखील खूप काही सांगून जातात. स्मशान शांतता असेल्या रस्त्यावरुन क्वचितच लोक जाताना दिसत आहेत. या जळालेल्या खिडक्या आणि आगीमुळे भस्मसात झालेल्या इमरतींचा भाग पाहून युक्रेनवर आलेलं युद्ध संकट किती भाषण असेल याची प्रचिती तुम्हाला या नव्या व्हिडीओतून येईल. त्या व्हिडीओतून (Russia Ukraine War Video) युक्रेनमधील सत्य परिस्थिती देखील दिसून येईल.
पाहा युक्रेनमधील हा नवा व्हिडीओ
— Shubham Kulkarni (@bhamkulkarni) March 4, 2022
बलाढ्य देशासमोर युक्रेन लढतोय!
युद्धामुळे रस्त्यांवर पडलेल्या वस्तू, तुटलेल्या झाडांमधून येथील नागरिक वाट काढून जातायेत. जीव मुठीत घेऊन युक्रेनचे नागरिक एक-एक दिवस काढतायेत. त्यांना माहीत नाही पुढे काय होईल. पण, तरीही ते जगतायेत. रात्री पडलेला काळोख आणि कुठेही लागलेली आग युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती विषद करते. हा नकोस झालेला काळोख युक्रेनला प्रकाशाकडे कधी नेईल, याची वाट युक्रेनचे नागरिक पाहतायेत. इच्छाशक्तीच्या जोरावर युक्रेन बलाढ्य रशियाशी दोन हात करतोच आहे. पण, हेच दोन हात करताना आणि आक्रमण होताना कधी कुणाचा जीव जाईल, कधी कोणतं शहर नाहीसं होईल, याची भीती आहे. हे युक्रेनमधील दृष्य आणि ही भाषणता पाहुण मानवतेसाठी तरी जगभरातील इतर देशांनी युक्रेनला आजघडीला आणि भविष्यात मदत करायला हवी.