Imran khan : हताश… निराश अन् टेन्शनमध्ये… अटकेनंतरचा इम्रान खान यांचा फोटो पाहिला का?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला आहे. इम्रान खान समर्थकांनी संपूर्ण देशात जाळपोळ सुरू केली आहे.

Imran khan : हताश... निराश अन् टेन्शनमध्ये... अटकेनंतरचा इम्रान खान यांचा फोटो पाहिला का?
Imran KhanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 9:55 AM

कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल दुपारी अटक करण्यात आली. इस्लामाबाद हायकोर्टातून त्यांना अटक करण्यात आली होती. एखाद्या दहशतवाद्याला पकडावं तसं इम्रान खान यांची मानगुटी पकडून त्यांना अक्षरश: ओढत ओढतच इम्रान यांना व्हॅनमध्ये टाकलं. अटकेनंतरचा इम्रान खान यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत इम्रान खान अत्यंत निराश दिसत आहेत. एका खुर्चीवर बसून इम्रान खान शून्यात पाहात आहेत. हताशपणे बसलेल्या इम्रान यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान हे काल काही प्रकरणाच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात गेले होते. इस्लामाबाद कोर्टात इम्रान खान बायोमॅट्रीक करत होते. त्याचवेळी पाकिस्तानी लष्कराच्या रेंजर्सनी इम्रान खान यांना उचलले. त्यानंतर इम्रान खान यांच्या अटकेविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र, कोर्टाने ही अटक योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे इम्रान खान यांना मोठा झटका बसला. त्यानंतर इम्रान खान यांना तुरुंगात ठेवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

नजर शून्यात, डोक्याला टेन्शन

इम्रान खान यांची कालची रात्र तुरुंगात गेली. त्यांच्या अटकेनंतरचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत इम्रान खान पांढरा कुर्ता आणि पांढऱ्या पायजम्यात दिसत आहेत. एका खुर्चीवर बसलेलेल इम्रान खान शून्यात पाहताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत आहे. हतबलपणे बसलेले इम्रान खान प्रचंड टेन्शनमध्ये दिसत आहेत. हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

इंटरनेट बंद, तरीही आगडोंब कायम

दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला आहे. इम्रान समर्थकांनी संपूर्ण देशभर आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू आहे. बसेस, खासगी वाहने जाळली जात आहेत. एवढंच कशाला या आंदोलकांनी थेट विमानतळ गाठून विमानही पेटवलं आहे. गव्हर्नर हाऊसलाही आग लावली आहे. त्यामुळे पाकिस्तानात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

हा हिंसाचार रोखण्यासाठी पाकिस्तानात कलम 144 लावण्यात आलं आहे. पण तरीही हिंसा काही थांबताना दिसत नाहीये. इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. मोबाईल ब्रॉडबँड सेवा बंद केली गेली आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसह इतर सोशल साईटसह बंद करण्यात आल्या आहेत. कोणतीही अफवा पसरू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, तरीही हिंसाचार थांबतना दिसत नाहीये.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.