पंतप्रधान मोदी युक्रेनमधून भारतात परतताच रशियाकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वीच युक्रेनमधून भारतात परतले आहे. त्याआधी मोदींनी रशियाचा देखील दौरा केला होता. या दौऱ्यानंतर रशियाकडून पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ले करण्यात आले आहे. व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनवर १०० हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केलाय.

पंतप्रधान मोदी युक्रेनमधून भारतात परतताच रशियाकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 9:17 PM

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात शहर उद्धवस्त झाले आहेत. या दरम्यान आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, रशियाने 100 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि 100 हून अधिक ड्रोनचा वापर करत युक्रेनवर हल्ला केलाय. ज्यामुळे मोठी हानी झाली आहे. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनचे सैन्य रशियाच्या कुर्स्क भागात पुढे जात आहे. तर दुसरीकडे, युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. त्यामुळे पोकरोव्स्क वाहतूक केंद्र बंद करण्यात आले आहे. झेलेन्स्की यांनी आपल्या मित्र देशांना युक्रेनसाठी हवाई संरक्षण यंत्रणांचा पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांनीही संयुक्त हवाई संरक्षण करार करावा. जेणेकरून एकत्रितपणे रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडता येतील. ते हवेतच नष्ट करता येतील. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात बहुतेक लक्ष्य वीज पुरवठा ग्रीड्स आणि पॉवर स्टेशन होते.

रशियाने कीव, विनितसिया, झिटोमिर, खमेलनित्स्की, नेप्रॉपेट्रोव्हस्क, पोल्टावा, निकोलायव्ह, किरोव्हाग्राड येथील विद्युत उपकेंद्रांना लक्ष्य केले. याशिवाय गॅस कंप्रेसर स्टेशन आणि गॅस वाहतूक यंत्रणा लक्ष्य करण्यात आली. याशिवाय कीन आणि डेनिप्रॉपेट्रोव्स्क भागातील एअरफील्ड आणि शस्त्रास्त्रे डेपोंना लक्ष्य करण्यात आले. रशियाने दावा केला आहे की त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्यावर अचूक मारा केला आहे. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा नाही. रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वीज खंडित झाली आहे. रशियाने हायपरसॉनिक मिसाईल किंजलचा वापर केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने 15 रशियन क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरांचे नुकसान झाले आहे.

झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. दुसरीकडे पुतिन यांनी आता कोणतीही चर्चा होणार नसल्याचे निवेदन जारी केले आहे. युक्रेनला योग्य उत्तर मिळेल असे ही त्यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.