Donald Trump : इमारतीच्या गच्चीवरुन ट्रम्प यांच्यावर केला गोळीबार, शूटर थॉमस मॅथ्यू क्रुक्स कॅमेऱ्यात कैद; का केला त्याने हल्ला, समोर आला Video
Matthew Crooks Attack On Donald Trump : जो बायडेन यांच्यावर हल्ला करणारा हा 20 वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रुक्स हा असल्याचे समोर आले आहे. एका इमारतीच्या छतावरुन तो गोळीबार करत होता. क्रुक्सचा हल्ल्यापूर्वीचा व्हिडिओ पण समोर आला आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला रक्ताचा डाग लागला. या गालबोटामुळे अमेरिकेची जगात नाचक्की झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या अवघ्या काही तासाच पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. या शुटर्संना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ टिपले होते. आता एका हल्लेखोरोचे नाव समोर आले आहे. थॉमस मॅथ्यू क्रुक्स असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. इमारतीवरुन त्याने बेछुट गोळीबार केला होता. त्याचा हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे.
जागीच टिपला
13 जुलै रोजी हा हल्ला झाला. ट्रम्प हे हल्लेखोराच्या निशाण्यावर होते. पण गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्यानंतर लागलीच ट्रम्प यांनी कानाला हात लावला. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त आले होते. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ कडे केले. सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावेळी एकच गडबड उडाली. अनेक समर्थक जमिनीवर झोपले. तर काहींनी सुरक्षित जागी आश्रय घेतला. एका इमारतीवरुन थॉमस मॅथ्यू क्रुक्स आणि दुसऱ्या ठिकाणाहून एक हल्लेखोर हल्ला करत होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला जागीच टिपला.
Donald Trump just got sh@t in the head and got up like a f*cking gangster and fist pumped pic.twitter.com/nhAKCxt65N
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 13, 2024
क्रुक्सची काढणार कुंडली
NY पोस्टनुसार, थॉमस मॅथ्यू क्रुक्स हा 20 वर्षांचा आहे. तो पेन्सिलवेनिया येथील बेथेल पार्कमधील रहिवासी आहे. त्याने ट्रम्प यांच्या सभेच्या स्थानापासूनच्या एका इमारतीच्या छतावरुन गोळीबार केला. 130 यार्डवरुन हा हल्ला केला. गोळीबार होताच सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्यात तो ठार झाला. आता पोलीस त्याची सर्व कुंडली बाहेर काढत आहेत. त्याचे सोशल मिडिया अकाऊंटमधून हल्ल्याविषयीची माहिती काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
WATCH: Shooter at Trump rally opened fire from the roof of a nearby building pic.twitter.com/AgMbtLqKEe
— BNO News (@BNONews) July 14, 2024
क्रुक्सचा व्हिडिओ पण आला समोर
क्रुक्स याचा एक व्हिडिओ पण समोर आला आहे. यामध्ये तो त्याचे नाव सांगतो. आपण रिपब्लिकन्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा तिटकारा, द्वेष करतो, असे तो या व्हिडिओत म्हणत आहे. त्यामुळे याच कारणामुळे त्याने हल्ला केला की, या हल्ल्यामागे अजून कोणी मास्टरमाईंड आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्व प्रकारामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
This was Trump’s Shooter
“My name is Thomas Matthew Crooks. I hate trump. I hate republicans.” pic.twitter.com/PcKlswboDC
— The Patriot Oasis™ (@ThePatriotOasis) July 14, 2024
(टीव्ही ९ मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.)
काय म्हणाले जो बायडेन
या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अमेरिकेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी विरोधी गोटातील उमेदवार ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी लागलीच ट्रम्प यांच्याशी संपर्क केला. त्यांची विचारपूस केली. ते आता सुरक्षित असल्याची माहिती घेतली. या हल्ल्याकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. अशा हल्ल्यांना अमेरिकेत स्थान नसल्याचे ते म्हणाले.