भल्या भल्यांना फुटतो घाम, ट्रम्प यांच्या सरकारमध्ये ही भारतीय महिला कोण?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी आणखी एक मोठी घोषणा केली. त्यांनी आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा त्यांच्या सरकारमध्ये समावेश केला आहे. ही ती व्यक्ती आहे जिच्या युक्तीवादाने अनेकांना घाम फुटतो. आता त्या ट्रम्प यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर दिसणार आहेत.

भल्या भल्यांना फुटतो घाम, ट्रम्प यांच्या सरकारमध्ये ही भारतीय महिला कोण?
harmeet dhillon
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 6:49 PM

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अनेक हुशार लोकांचा समावेश केला जात आहे. आता माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या सर्वोच्च कायदेशीर पदासाठी हरमीत ढिल्लन यांची निवड केली आहे. सहाय्यक ऍटर्नी जनरल पदासाठी हरमीत यांनी निवड करण्यात आलीये. ढिल्लन यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्या न्याय विभागात नागरी हक्कांसाठी सेवा पुरवतात. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. हरमीत ढिल्लन या मूळचे भारतीय-अमेरिकन आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या आधी डॉ जय भट्टाचार्य, विवेक रामास्वामी आणि कश्यप पटेल यांचाही आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे. ढिल्लन या प्रसिद्ध वकील आहेत. ज्या नागरी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी लढतात. ढिल्लन यांची फी देखील इतकी आहे की त्यावरुन त्यांची योग्यता कळते.

ढिल्लन किती शुल्क घेतात?

ट्रम्प आणि हरमीत ढिल्लन यांची आधीपासूनच ओळख आहे. कारण 2023 मध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदेशीर गोष्टींसाठी $50 दशलक्ष खर्च केले होते. ज्यात चार वकिलांना समावेश होता. या वकिलांमध्ये हरमीत ढिल्लॉनचेही नाव होते. यावेळी त्यांना पेमेंट म्हणून 46.1 लाख डॉलर (सुमारे 40 कोटी रुपये) मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्यावर 91 गुन्हे नोंद आहेत.

54 वर्षीय ढिल्लन यांचा जन्म चंदीगडमध्ये झालाय. त्या लहान असताना त्यांचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. हरमीत यांनी नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथेमॅटिक्समधून येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतलंय. त्यांनी डार्टमाउथ कॉलेजमधून शास्त्रीय साहित्यात बीए आणि व्हर्जिनिया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहे.

कशी केली करिअरची सुरुवात

1993 मध्ये हरमीत ढिल्लन यांनी कोर्टात लिपिक म्हणून काम सुरू केले. 1994 ते 1998 दरम्यान त्यांनी शेरमन आणि स्टर्लिंग येथे सहयोगी म्हणून काम केले. 1998 ते 2002 मध्ये त्यांनी लॉ फर्ममध्ये काम केले. 2003 ते 2004 पर्यंत, ढिल्लन यांनी ऑरिक, हॅरिंग्टन आणि सटक्लिफ येथे सल्लागार म्हणून काम केले. 2004 मध्ये त्यांनी Dhillon Law Group Inc. ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून नाही पाहिले. त्यांना वकिली सुरु केली. व्यवसाय खटला, बौद्धिक संपदा खटला, संस्थापक आणि कार्यकारी विवाद, रोजगार खटला, बदनामी, SLAPP विरोधी, प्रथम दुरुस्ती, इंटरनेट गोपनीयता आणि ग्राहक वर्ग कारवाई प्रकरणे अशा वेगवेगळ्या खटल्यासाठी त्यांनी वकील म्हणून काम केले.

ढिल्लन यांनी मागच्या वर्षी रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली पण त्यांना यश आले नाही. आता त्यांची नियुक्ती ट्रम्प प्रशासनातील भारतीय-अमेरिकन समुदायाचा वाढता प्रभाव दर्शवतेय. ढिल्लन यांचे कौशल्य आणि त्यांचा अनुभव त्यांना या महत्त्वाच्या पदापर्यंत घेऊन आली आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.