PNB Scam भारतातून पळाल्यावर मेहुल चोक्सीने एंटीगाच्या विरोधी पक्षनेत्यांना लाच दिली, पंतप्रधान ब्राउन यांचा गंभीर आरोप

एंटीगा आणि बारबुदाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउनी (Gaston Browne) यांनी मेहुल चोक्सीवरुन तेथील विरोधी पक्षावर गंभीर आरोप केलेत.

PNB Scam भारतातून पळाल्यावर मेहुल चोक्सीने एंटीगाच्या विरोधी पक्षनेत्यांना लाच दिली, पंतप्रधान ब्राउन यांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 5:53 PM

सेंट जोहन : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी आणि फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) एंटीगामध्ये अटक झाली. यानंतर एंटीगा आणि बारबुदाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउनी (Gaston Browne) यांनी तेथील विरोधी पक्षावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, “एंटीगाचा विरोधी पक्ष युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टीने (यूपीपी) निवडणूक निधीसाठी चोक्सीला पाठिंबा दिला आहे. आधी माझ्या सरकारवर मेहुल चोक्सीला पाठिशी घातल्याचा आरोप केल्यानंतर आता ते निवडणूक निधीसाठी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत (Mehul Choksi bribe Opposition party allegations by Antigua PM).”

‘आमचं सरकार चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी आणि त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जेणेकरून मेहुल चोक्सीवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले चालवता येतील. (Antigua PM on Mehul Choksi). आमच्या सरकारनं चोक्सीचं नागरिकत्व रद्द केल्यानं त्याच्या कोणत्याही संवैधानिक आणि कायदेशीर सुरक्षेचं उल्लंघन होत नाही.’ असंही सांगितलं जातंय की चोक्सी 25 मे रोजी एंटिगाच्या दक्षिण भागातील रेस्त्रांमध्ये गेल्यानंतर गायब होता. याआधी एटिंगाच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधान ब्राउनी यांच्यावर अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला होता.

विरोधी पक्षाचे एंटिगाच्या पंतप्रधानांवर गंभीर आरोप

चोक्सीला बुधवारी (26 मे 2021) अटक करण्यात आली. सध्या तो डोमिनिकाच्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर एंटिगामध्ये अवैधपणे राहत असल्याचा आरोप आहे. यानंतर पंतप्रधान ब्राउनी यांनी डोमिनिका प्रशासनाला चोक्सीला एंटिगाला न पाठवता थेट भारताकडे प्रत्यार्पित करण्याचे निर्देश दिले आहेत (Mehul Choksi Citizenship Antigua). याला एंटिगाच्या विरोधी पक्षांनी विरोध केलाय. एंगीटा न्यूजच्या बातमीनुसार, विरोधी पक्ष यूपीपीने म्हटलं, ‘पंतप्रधान गॅस्टन ब्राऊनी यांच्या सरकारनेच मेहुल चोक्सीला नागरिकत्व दिलं होतं. आता ही गोष्ट लज्जास्पद झालीय. चोक्सी एंटीगाचा नागरिक आहे, भारताचा नाही.’

चोक्सीकडून अपहरणाचा आरोप

दुसरीकडे मेहुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केलाय. एंटीगा आणि बारबुदाचे पोलीस प्रमुख एटली रॉडने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, “अपहरणाचा दावा केवळ मेहुल चोक्सीचे वकीलच करत आहेत. पोलिसांकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत (Mehul Choksi Current Status). डोमिनिका पुोलिसांनी या अपहरणाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. चोक्सीला डोमिनिका नेण्यात एंटीगा पोलिसांचा कोणताही सहभाग नाही.”

मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.

हेही वाचा :

Photo : डोमिनिका जेलमधून मेहुल चोक्सीचा पहिला फोटो समोर, हातावर दुखापतीचे व्रण!

PNB Scam | ‘पीएनबी’ घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेड्या, नवा फोटो पाहिलात?

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

व्हिडीओ पाहा :

Mehul Choksi bribe Opposition party allegations by Antigua PM

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.