Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mehul Choksi : ‘भारतातून पळून गेलेलो नाही, उपचारासाठी देश सोडला’, घोटाळेबाज मेहुल चोक्सीचा अजब दावा

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने (Mehul Choksi) आता अजब दावा केलाय.

Mehul Choksi : ‘भारतातून पळून गेलेलो नाही, उपचारासाठी देश सोडला’, घोटाळेबाज मेहुल चोक्सीचा अजब दावा
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 2:36 AM

सेंट जॉन : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीने (Mehul Choksi) आता अजब दावा केलाय. मेहुल चोक्सी म्हणाला, “मी कायदे मानणारा व्यक्ती आहे. मी भारतातून पळून गेलेलो नाही. मी उपचारासाठी देश सोडला.” मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये (Dominica) अटक झालीय. त्यानंतर चोक्सीने डोमिनिकाच्या उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्जही दाखल केला. मात्र, न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. दुसरीकडे भारतानेही मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशी प्रक्रियेला वेग दिलाय (Mehul Choksi claim about allegations of PNB Scam).

डोमिनिका उच्च न्यायालयात (Dominica High Court) दाखल करण्यात प्रतिज्ञापत्रात मेहुल चोक्सी याने म्हटलं आहे, “मी भारतीय अधिकाऱ्यांना माझी भेट घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे. तसेच त्यांनी माझ्यावरील आरोपांवर माझी कोणतीही मुद्द्यावर चौकशी करावी. मी भारताच्या तपास संस्थांपासून पळून आलेलो नाही. मी उपचारासाठी भारतातून अमेरिकेला गेलो तेव्हा माझ्याविरोधात कोणत्याही तपास संस्थेचं वॉरंट नव्हतं.”

जानेवारी 2018 मध्ये मेहुल चोक्सी भारत सोडून फरार

देशात PNB घोटाळ्याचे (PNB Scam) आरोप झाल्यानंतर मेहुल चोक्सीचं नाव चर्चेत आलं. याच काळात चोक्सी भारत सोडून गेला. आरोपांआधीच चोक्सीने भारतातून पळण्याची तयारी केल्याचाही आरोप झालाय. 2017 मध्ये चोक्सीने एंटीगा अँड बारबुडाचं (Antigua and Barbuda) नागरिकत्व घेतलं होतं.

चोक्सीकडून अपहरणाचा आरोप

दरम्यान, मेहुल चोक्सीने आपलं अपहरण करुन डोमिनिकाला नेल्याचा आरोप केला होता. एंटीगा आणि बारबुदाचे पोलीस प्रमुख एटली रॉडने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, “अपहरणाचा दावा केवळ मेहुल चोक्सीचे वकीलच करत आहेत. पोलिसांकडे याचे कोणतेही पुरावे नाहीत (Mehul Choksi Current Status). डोमिनिका पुोलिसांनी या अपहरणाच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. चोक्सीला डोमिनिका नेण्यात एंटीगा पोलिसांचा कोणताही सहभाग नाही.”

मेहुल चोक्सी भारतातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा मामा आहे. हे दोघेही 13 हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.

हेही वाचा :

‘पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्यानेच कारवाई नाही; मुश्रीफ यांचं धक्कादायक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ‘मेहुलभाई, मेहुलभाई’ बोलत होते, मग मेहुलभाई देशातून पळाला कसा? : नवाब मलिक

व्हिडीओ पाहा :

Mehul Choksi claim about allegations of PNB Scam

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.