ज्या दिवशी लादेनला ओबामाच्या आदेशावर मारलं त्यादिवशी तुम्ही त्यांच्यासोबत सेक्स केला? काय म्हणाल्या पत्नी मिशेल ओबामा?…
बराक ओबामांची ओळख जगाला आहे. पण कुशाग्र बुद्धीमत्तेची महिला म्हणून मिशेल ओबामा यांची ओळख आहे. त्यातल्या त्यात एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं याचं उदाहरणच मिशेल ओबामा प्रत्येक वेळेस घालून देतात.
मुंबई : बराक ओबामांची ओळख जगाला आहे. पण कुशाग्र बुद्धीमत्तेची महिला म्हणून मिशेल ओबामा (Michelle Obama) यांची ओळख आहे. त्यातल्या त्यात एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं याचं उदाहरणच मिशेल ओबामा प्रत्येक वेळेस घालून देतात. बरं त्या मोजूनमापून बोलतात. असाच एक प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला गेला आणि त्याच्या उत्तराची आता जगभर चर्चा होती आहे.(Michelle Obama answers about sex life with Barak Obama)
मिशेल बराक ओबामांना तो लाखमोलाचा सवाल
बराक ओबामांची पत्नी एवढीच मिशेल यांची ओळख नाही. त्या उत्तम कूक आहेत. त्याचे काही शोजही त्या करत असतात. जिम्मी किमेल(Jimmy Kimmel) यांच्या एका शोमध्ये त्या स्वत:चा शो Waffels+Mochi चं प्रमोशन करण्यासाठी आल्या होत्या. आता समोर पाहुण्या मिशेल म्हटल्यानंतर जिम्मीना प्रश्न विचारण्याची घाई तर होतीच पण मनातला प्रश्न विचारल्याशिवाय ते शांतही होणार नव्हते. काही प्रश्न झाल्यानंतर जिम्मीनं बाँबगोळा टाकला. तो म्हणाला, मी आधीही हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि आता पुन्हा विचारतो आहे, ज्या दिवशी नेव्ही सील बराक ओबामांच्या आदेशावर ओसामा बिन लादेनचा खात्मा केला त्यादिवशी तुम्ही त्यांच्यासोबत लव्हमेकिंग(सेक्स) केला का? आता एवढ्या खासगी प्रश्नावर मिशेल काय उत्तर देणार म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. मिशेल यांच्या चेहऱ्यावर मात्र कुठलाही अवघडलेपणा नव्हता. त्यांनीही त्याच बेबाक अंदाजात, प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं.
पाहा मिशेल ओबामा यांचा व्हिडीओ
View this post on Instagram
(Michelle Obama answers about sex life with Barak Obama)
काय होतं मिशेल ओबामांचं उत्तर?
मिशेल ओबामांनी ना ह्या प्रश्नावर शो सोडला आणि काही आतताईपणा केला. तशी त्यांची ओळखच नाही. उलट प्रश्नकर्त्याचं तोंड बंद करण्यासाठी मिशेल म्हणाल्या, मी तुमच्या दर्शकांना सांगू इच्छिते की, का कुणास ठाऊक, एवढ्या मोठ्या आणि महत्वपूर्ण मिशनमध्ये तुम्हाला एवढाच भाग का महत्वाचा वाटतो? इतर कुणाला कधी असं विचारावसं नाही वाटलं. मुलाखतीच्या इतिहासात क्वचितच कुणी एवढ्या खालच्या पातळीवर गेलं असेल.
घरात बेस्ट कूक कोण?
मिशेल ओबांमांनी जे उत्तर दिलं आणि ज्या शिताफीनं त्यांनी प्रश्न संपवलं त्याची जगभर तारीफ होते आहे. नंतर मुलाखतकारानेही तो प्रश्न सोडला. कदाचित पुन्हा असा प्रसंग आला तर तो पुन्हा तोच प्रश्न विचारण्याचं नाकारता येत नाही. कारण याआधीही मिशेल यांना याच मुलाखतकारानं हाच प्रश्न विचारला होता. नंतर मिशेल यांना घरात बेस्ट कुक कोण? ओबामा की मिशेल? त्यावर मात्र त्यांनी बराक ओबामांपेक्षा किती तरी पटीनं सरस कुक असल्याचं सांगितलं. घरात असताना त्यांचा बराच वेळ किचनमध्ये जातो असही त्या सांगायला विसरल्या नाहीत.
(Michelle Obama answers about sex life with Barak Obama)
हेही वाचा :
Video : आता कुत्रे कोरोनाचा शोध घेणार, थायलंड विद्यापीठाचा दावा, पहा प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ
पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?