रशियात कामाच्या ठिकाणी प्रजननचा प्रस्ताव, सेक्स मिनिस्ट्री ही सुरु होणार; काय आहे प्रकरण

जगभरातील नेते लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रशियामध्ये तर सेक्स मिनिस्ट्री उघडण्याचा विचार सुरू आहे. जपानमध्येही विचित्र प्रस्ताव आला आहे. अशा स्थितीत जग बळजबरीने लोकसंख्या वाढवण्याकडे का झुकले आहे. जाणून घ्या

रशियात कामाच्या ठिकाणी प्रजननचा प्रस्ताव, सेक्स मिनिस्ट्री ही सुरु होणार; काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 9:06 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लोकांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. ते म्हणाले होते की, देशातील प्रजनन दर 2.1 आहे आणि आंध्र प्रदेशात तो 1.6 आहे. जर असेच चालू राहिले तर 2047 पर्यंत आंध्रमध्ये वृद्ध लोकांची संख्या मोठी असेल. सरकार लवकरच एक नवीन कायदा आणणार आहे. ज्यामुळे दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक निवडणुका लढवता येतील. चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही असेच काही म्हटले. नवीन जोडप्यांना प्रत्येकी 16 मुले असावीत असेही त्यांनी  म्हटले. अधिकाधिक मुले निर्माण करण्याचे हे आवाहन केवळ भारतापुरते मर्यादित नाही.

वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने 80 च्या दशकात ‘वन चाइल्ड पॉलिसी’ लागू केली होती. त्यामुळे लोकसंख्या तर थांबली पण वृद्धांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्या नंतर ‘दोन अपत्य’ आणि नंतर ‘तीन अपत्य’ धोरण राबवण्यात आले. गेल्या वर्षीच चीनने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे लोकांना लग्न करण्यास आणि अधिक मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.

जगभरातील अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढवत असताना प्रजनन दर कमी करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जात आहेत. पण रशियामध्ये अलीकडेच ‘कामाच्या ठिकाणी सेक्सचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या अंतर्गत लोकांना कार्यालयात लंच किंवा कॉफी ब्रेक दरम्यान सेक्स आणि मुले जन्माला घालण्याचे सुचविले होते.

आता रशिया घटत्या प्रजनन दरात वाढ करण्यासाठी ‘सेक्स मिनिस्ट्री’ स्थापन करण्याचा विचार करत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निकटवर्तीय नीना ओस्तानिया यांनी ‘सेक्स मिनिस्ट्री’ सुरु करण्याचा प्रस्ताव विचारात घेतला आहे. एवढेच नाही तर जपानमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते नाओकी हयाकुटा यांनी एक अजब प्रस्ताव ठेवला आहे. वयाच्या 25 वर्षांनंतर मुलींना लग्न करण्यास बंदी घालण्यात यावी आणि वयाच्या 30 वर्षांनंतर त्यांचे गर्भाशय जबरदस्तीने काढून टाकण्यात यावे. या प्रस्तावामुळे चांगलाच गदारोळ झाला आहे. वाद ओढवल्यानंतर ह्यकुटा यांनी माफी मागितली. महिलांना लवकर मूल होण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे घटत्या प्रजनन दरात वाढ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

वाढत्या लोकसंख्येवर भर का?

पाच दशकांपूर्वी पॉल एलरिच यांनी पुस्तकात ‘लोकसंख्येचा विस्फोट’ असा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की एक दिवस लोकसंख्या इतकी वाढेल की लोकं उपाशी मरतील आणि पृथ्वी ‘मृतांचा ग्रह’ होईल. त्यांच्या या पुस्तकाने जगाची चिंता वाढवली होती. पण आता नेमके उलटे झाले आहे. दोन वर्षांपूर्वी इलॉन मस्क म्हणाले होते की, भविष्यात घटता जन्मदर ही जागतिक तापमानवाढीपेक्षाही मोठी समस्या असेल. त्यांनी लोकांना अधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिलाय. तज्ज्ञांच्या मते घटत्या प्रजनन दरामुळे जगभरातील सरकार तणावात आहेत.

जुलैमध्ये संयुक्त राष्ट्रांचा अहवाल आला होता. ज्यामध्ये 1990 च्या तुलनेत आता महिलांना मुले कमी होत असल्याचे म्हटले आहे. असा अंदाज होता की 2080 पर्यंत पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या 10 अब्ज पार करेल आणि त्यानंतरच ती कमी होऊ लागेल. या वर्षी मार्चमध्ये लॅन्सेट या सायन्स जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला होता. वॉशिंग्टन विद्यापीठाने हा अभ्यास केला आहे. यामध्ये 1950 ते 2021 या कालावधीतील 204 देशांच्या प्रजनन दराचे विश्लेषण करण्यात आले. 2100 चे अंदाजपत्रकही काढण्यात आलेय. आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत, जिथे प्रजनन दर खूपच कमी असेल, असे सांगण्यात आलेय. यात असा अंदाज होता की 2050 पर्यंत जगातील तीन चतुर्थांश देश असतील जेथे प्रजनन दर सरासरीपेक्षा कमी असेल. 2100 पर्यंत जगातील 97% देश असे होतील.

प्रजनन दर दर्शवितो की स्त्री तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते किंवा जन्म देऊ शकते. जागतिक बँकेच्या मते, 60 च्या दशकात जगभरात सरासरी प्रजनन दर 5 पेक्षा जास्त होता. सध्या जगातील सरासरी प्रजनन दर 2.3 आहे. घटत्या जन्मदरामुळे वृद्धांची संख्या वाढत आहे.

भारतात परिस्थिती काय?

घटता प्रजनन दर आणि वाढती वृद्ध लोकसंख्या यामधून भारतही सुटलेला नाही. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राने ‘इंडिया एजिंग रिपोर्ट 2023’ जारी केला होता. ज्यात असे म्हटले होते की 2050 पर्यंत भारताच्या लोकसंख्येच्या 20.8% लोकं वृद्ध असतील. वृद्ध म्हणजे ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असेल. या अहवालात 2010 पासून भारतातील वृद्धांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकसंख्येतील १५ वर्षांखालील लोकांची संख्या कमी होत आहे आणि वृद्धांची संख्या वाढत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.