मॉडेलची कमाल ! घामापासून बनवलेल्या परफ्यूमची करतेय विक्री; दावा ऐकाल तर डोळे फिरतील गरागरा
जगात नेहमी काहीना काही गोष्टी आश्चर्यकारक घडत असतात. अशा गोष्टींवर विश्वास ठेवणेही कठीण जाते. पण त्या खऱ्या असतात. आता एका मॉडेलने तिच्या घामापासूनच परफ्यूम बनवल्याची बातमी समोर आली आहे.
न्यूयॉर्क : विकणाऱ्याचं सोनंही विकलं जातं असं म्हटलं जातं. त्याची प्रचिती न्यूयॉर्क शहरात आली आहे. एका मॉडलने चक्क तिच्या घामापासून बनवलेला परफ्यूम विकण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईनवरून या परफ्यूमची विक्री होत आहे. लोक फुलांपासून बनवलेला परफ्यूम वापरतात. कुणाच्या घामापासून बनवलेला परफ्यूम कसा वापरेल? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण हे खरंय. मॉडेलने चक्क घामापासून बनवलेला परफ्यूम विकण्यास सुरुवात केली आहे.
वेनेसा मौरा असं या मॉडेलचं नाव आहे. तिने 2021मध्ये हा परफ्यूम तयार केला आहे. माझ्या शरीराचा नैसर्गिक सुगंध पुरुषांना उत्तेजक आणि सेक्सी वाटतो, असा दावा वेनेसाने केला आहे. वेनेसा ही अवघ्या 29 वर्षाची आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 10 लाखाहून अधिक फॉलोअर आहेत.
सुगंध सेक्सी आणि आकर्षक
आपला अनोखा सेंट कोणत्याही पुरुषाला आपल्याकडे आकर्षित करू शकतो. माझ्या आधीच्या प्रियकारांनाही माझ्या शरीराचा सुगंध सेक्सी आणि आकर्षक वाटायचा, असंही तिचं म्हणणं आहे. सेंटचा फॉर्मुला तयार करण्यासाठी वेनेसाने प्रत्येक बॉटलमध्ये तिच्या घामाचे 8 ml थेंब टाकले आहेत. या सेंटमध्ये मँडरिन ऑरेंज, बरगमोट आणि पिंक पेपरच्या फ्रुटी नोट्स शिवाय त्यात माझा टच- माझा घाम स्पेशल आहे, असं ती अभिमानाने सांगते. हे पॅशन आणि मिस्ट्रीचे कॉम्बिनेशन आहे, असंही तिने सांगितलं.
‘फ्रेश गॉडेसची भूरळ
डेटिंगसाठी हा सेंट आयडियल मिक्स आहे. कारण माझ्या त्वचेचा नैसर्गिक सुंगधच सेक्सी आहे, असा दावाही वैनेसाने केला आहे. तिने आपल्या या सेंटचं नाव अनोखं ठेवलं आहे. ‘फ्रेश गॉडेस’ अस तिच्या परफ्यूमचं नाव आहे. तिने या परफ्यूमची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. त्यावर तिच्या फॉलोअर्सच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
अन् डेटवर गेलो
हा परफ्यूम खरोखरच खूप चांगला आहे, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तर हा परफ्यूम वापरणाऱ्या एकाने त्याच्या मित्राच्या गळ्याचा सुगंध घेतला तर त्याचं त्याच्यावर प्रेम जडलं, असा दावा तिने केला आहे. काही फॉलोअर्सने परफ्यूम लावला. त्यामुळे ते माझ्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर आम्ही दोन दिवसात डेटलाही गेलो होतो, असा दावा तिने केला आहे.